Happy Birthday Damian Maia : मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट डेमियन माइया

74
Happy Birthday Damian Maia : मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट डेमियन माइया
Happy Birthday Damian Maia : मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट डेमियन माइया

डेमियन माइया एक ब्राझिलियन प्रोफेशनल मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट आहे. तसेच फिफ्थ डिग्री ब्रॅझेलियन जुउ-जित्सू (बीजेजे) ब्लॅक बेल्ट आहे. त्याचा जन्म ६ नोव्हेंबर १९७७ रोजी ब्राझीलमधील साओ पाउलो येथे झाला. त्याने लहानपणीच ज्युडोचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या चौथ्या वर्षीच त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली आणि तो सहा वर्षांचा होईपर्यंत तो पूर्णपणे प्रशिक्षित झाला होता. असा अद्भुत चमत्कार क्वचितच घडतो. कदाचित त्याने याच कारणासाठी जन्म घेतला असावा. (Happy Birthday Damian Maia)

अगदी लहानपणीच त्याने त्याची कारकीर्द ठरवून टाकली होती. किशोरवयात तो कुंगफू आणि कराटेचं शिक्षण घेऊ लागला. त्याचा हा प्रवास अविरत सुरुच होता. दिवस रात्र मेहनत करणे आणि एक चांगला फायटर होणे हेच ध्येय त्याने ठेवलं होतं. १९ व्या वर्षी भावाच्या आग्रहाखातर त्याने जिउ-जित्सूचे प्रशिक्षण घेतले. त्याची जिद्द आणि कष्ट करण्याची वृत्ती इतकी चांगली आणि उच्च होती की ४ – ५ वर्षांत त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला.

विशेष म्हणजे त्याने पत्रकारितेची पदवी मिळवली. फायटर असून पत्रकारितेत पदवी मिळवली वाचायला अगदीच विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. तो ब्राझिलियन जिउ-जित्सूमध्ये फिफ्त डिग्री ब्लॅक बेल्ट झाला आणि त्याने ब्रासाच्या टीममधून अनेक मोठमोठ्या स्पर्धांमधून जेतेपद पटकावले आहे. माइयाने अल्टिमेट फायटिंग चम्पियनशिच्या वेल्टरवेट आणि मिडलवेट या दोन्ही विभागांत पराक्रम गाजवला आहे. माइयाला सबमिशन ग्रॅप्लिंगमध्ये एडीसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, द वर्ल्ड जिउ-जित्सू कप आणि पॅन-अमेरिकन चॅम्पियनशिप्समध्ये सुवर्ण पदके मिळाली आहेत.

माइयाची आई रशियन वंशाची आहे. त्याच्या पत्नीचे नाव रेनाटा आहे व ती ब्राझीलच्या मॅगझिनमध्ये काम करते. माइयाला पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इंग्लिश भाषा बोलता येतात. आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना मिळावा म्हणून त्याने २०२० मध्ये साओ पाउलो येथे नवीन अकॅडेमी उघडली आहे, ज्यामध्ये जिउ-जित्सू म्युझियम देखील आहे. २०२३ पासून तो यूएफसी फाइट पास ब्राझीलसाठी कॉमेंट्री टीम मेंमर म्हणूनही काम करतोय.

माइया फाईट करताना नेहमीच विरोधकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. त्याला ग्राउंड फायटर म्हणून ओळखले जाते. त्याचा अटॅकिंग स्वभाव त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो. तो अतिशय कसलेला फायटर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.