बापरे! विवाहबाह्य संबंध ठेवले म्हणून महिलेला चक्क चाबकाने फोडले

85

इंडोनेशियातील आचे प्रांतात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. इंडोनेशियामध्ये एका महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल जबर शिक्षा दिली आहे. या महिलेला १०० चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या सोबत असणाऱ्या पुरूष साथीदाराला फक्त १५ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली आहे. इंडोनेशियात चाबूक मारणे ही शिक्षेची सामान्य प्रथा आहे. ही शिक्षा इस्लामिक शरिया कायदा प्रणालीनुसार, महिलेलादेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

इंडोनेशियातील महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवले म्हणून तिला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके देण्यात आले. ही शिक्षा महिलेले देण्यात येत होती, तेव्हा शेकडो लोक तेथे जमले होते. यावेळी अडवणूक करता त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. महिलेला ही शिक्षा करताना महिलेला चाबकाचा मार सहन न झाल्याने फटके मारण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती. दरम्यान, विवाहित महिलेने तिच्या विवाहबाह्य पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने विवाहित महिलेला ही कठोर शिक्षा सुनावली.

(हेही वाचा –पवई तलावातील जलचरांना आयआयटी आणि रेनेसान्सचा धोका)

whip 1

महिलेने ज्या व्यक्तीसोबत हे संबंध असल्याची कबुली दिली होती, त्या व्यक्तीने न्यायालयात असे कोणतेही नाते स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायाधीश त्याला दोषी ठरवू शकले नाहीत. खटल्यादरम्यान त्याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले आणि काहीही कबूल केले नाही, त्यामुळे तो दोषी आहे की नाही हे न्यायाधीश सिद्ध करू शकले नाहीत, अशी माहिती पूर्व आचे प्रांताच्या फिर्यादी कार्यालयातील तपास विभागाचे प्रमुख इव्हान नज्जर अल्लावी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.