Rajyavardhan Singh Rathore : भारतीय नेमबाज, निवृत्त कर्नल आणि राजकारणी अशा क्षेत्रांत उत्तमरित्या जबाबदारी पार पाडणारे राज्यवर्धनसिंह राठोड

Rajyavardhan Singh Rathore : २००२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मॅंचेस्टर येथे त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांना सांघिक सुवर्ण पदक देखील मिळाले आहे.

172
Rajyavardhan Singh Rathore : भारतीय नेमबाज, निवृत्त कर्नल आणि राजकारणी अशा क्षेत्रांत उत्तमरित्या जबाबदारी पार पाडणारे राज्यवर्धनसिंह राठोड
Rajyavardhan Singh Rathore : भारतीय नेमबाज, निवृत्त कर्नल आणि राजकारणी अशा क्षेत्रांत उत्तमरित्या जबाबदारी पार पाडणारे राज्यवर्धनसिंह राठोड
कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी नेमबाजीत ऑलिंपिक पदक पटकावले होते आणि ते भारतीय सैन्यातील निवृत्त कर्नल आहेत. त्याचबरोबर आता ते राजस्थानचे क्रीडा मंत्री देखील आहेत. विशेष म्हणजे तिन्ही जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडत आहेत. राज्यवर्धनसिंह राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांचा जन्म राजस्थानमधील जैसलमेर येथे २९ जानेवारी १९७० रोजी झाला.
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू जेंटलमन कॅडेटसाठी स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित
त्यांचे वडील लक्ष्मण सिंग राठोड हे निवृत्त कर्नल आहेत आणि आईचे नाव मंजू राठोड आहे. त्यांनी बी.ए. ची पदवी प्राप्त केली असून इन्स्ट्रक्टर-व्हेपन्स (एमएमजी, एजीएल, स्मॉल आर्म्स) तसेच ग्रेडिंग टॅक्टिक्स (YO) कोर्स देखील केला आहे. एनडीए मधून पदवी प्राप्त केल्यानंतर राठोड इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये दाखल झाले. त्यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू जेंटलमन कॅडेटसाठी स्वॉर्ड ऑफ ऑनरने (Sword of Honor) सन्मानित करण्यात आले. ते शिख रेजिमेंट सुवर्णपदक देखील प्राप्तकर्ते होते.
कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत
२००२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मॅंचेस्टर येथे त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांना सांघिक सुवर्ण पदक देखील मिळाले आहे. मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्स २००६ मध्ये सुद्धा त्यांना सुवर्ण पदक मिळाले. २००४ आणि २००६ साली वर्ल्ड शूटिंग चम्पियनशिप्समध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावून भारताचा अभिमान उंचावला. राठोड भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि राठोड २०१४ पासून २०२३ पर्यंत जयपूर ग्रामीण मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. ते डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थान सरकारमधील उद्योग आणि वाणिज्य, युवा व्यवहार आणि क्रीडा खात्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत. (Rajyavardhan Singh Rathore)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.