भारतीय बायोकेमिस्ट आणि बायो टेक्नॉलॉजिस्ट Govindarajan Padmanabhan

325

गोविंदराजन पद्मनाभन (Govindarajan Padmanabhan)हे  भारतीय बायोकेमिस्ट आणि बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत. त्यांचा जन्म २० मार्च १९३८ रोजी मद्रास येथे झाला. पद्मनाभन यांच्या कुटुंबामध्ये जवळजवळ सगळेच इंजिनिअर होते. ते तामिळनाडूतील तंजोर जिल्ह्यातील असून ते बंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते. बंगळुरूमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

मात्र पुढे त्यांच्या (Govindarajan Padmanabhan) लक्षात आले की त्यांना अभियांत्रिकीमध्ये रस नाही. मग त्यांनी रसायनशास्त्रात पदवी पूर्ण करण्यासाठी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे मृदा रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून १९६६ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएच.डी. पूर्ण केली.

त्यांच्या (Govindarajan Padmanabhan) संशोधनाच्या सुरुवातीच्या वर्षात, त्यांनी प्रामुख्याने यकृतातील यूकेरियोटिक जनुकांच्या ट्रान्सक्रिप्शन नियमनात काम केले. सेल्युलर प्रक्रियेत हेमची बहुआयामी भूमिका स्पष्ट करण्यात त्यांना रस होता. त्यांनी मलेरियाच्या परजीवीमध्ये हेम-बायो सिंथेटिक मार्ग शोधून काढला. २००४ मध्ये कर्क्युमिनच्या मलेरियाविरोधी गुणधर्म आणि कॉम्बिनेशन थेरपीमध्ये त्याची प्रभावीता दाखवण्यात त्यांची टीम यशस्वी झाली होती.

गोविंदराजन पद्मनाभन (Govindarajan Padmanabhan) हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे माजी संचालक होते आणि सध्या ते IISc मधील बायोकेमिस्ट्री विभागात मानद प्राध्यापक आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूचे कुलपती म्हणून काम करत आहेत.त्यांना शांती स्वरुप भटनागर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.