हिंदू मुलीला जाळणाऱ्या ‘शाहरुख’चे नाव दाखवले ‘अभिषेक’; सोशल मीडियावर टीकेची झोड

122

झारखंड येथे एका हिंदू मुलीवर शाहरुख हुसेन याने पेट्रोल टाकून तिला जाळले, या घटनेनंतर याचे वृत्त दाखवताना ‘इंडिया टुडे’ ने चक्क शाहरुखचे नाव ‘अभिषेक’ सांगून त्याची मुसलमान ही ओळख लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे सोशल मीडियात यावर जोरदार टीका टिप्पण्णी सुरु झाली आहे. सोशय मीडियातून ‘इंडिया टुडे’चा निषेध होऊ लागला आहे.

‘इंडिया टुडे’कडून हिंदू द्वेष

एखाद्या मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाला तर त्यात पीडित किंवा अल्पवयीन मुलीची ओळख लपवली जाते किंवा काही वेळा नाव बदलले जाते. पण इथे ‘इंडिया टुडे’ या माध्यमाने चक्क मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी एका मुस्लिमाला हिंदू घोषित करण्यात आले. ‘इंडिया टुडे’ने आरोपी शाहरुख हुसेनचे नाव आपल्या मथळ्यातून लपवले आहे. ‘इंडिया टुडे’ने या बातमीच्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आरोपी अभिषेक हा पोलीस कोठडीत हसताना दिसत आहे.’ तसेच ‘आरोपी अभिषेकला पोलिसांच्या गाडीत हातकडी घालून घेऊन जात असताना तो हसताना दिसत होता’, असेही म्हटले आहे. शाहरुखने हिंदू मुलीवर ५ वर्षे अत्याचार केल्यानंतर त्याने तिला जिवंत जाळले. त्याने अनेकवेळा मुलीचा विनयभंग केला होता. घरात घुसून त्रास दिला. गुन्हेगार किंवा दहशतवादी मुस्लिम असेल, मग त्याला मीडिया हिंदू का दाखवत आहे?, असा प्रश्न विचारला जात आहे.

(हेही वाचा ‘त्यांच्याकडून चूक झाली, मुख्यमंत्र्यांनी दिली समज’, गोगावलेंच्या विधानावरुन केसरकरांचे स्पष्टीकरण)

सोशल मीडियात टीकेची झोड 

याप्रकरणी अंशुल सक्सेना म्हणतात की, अंकिताला शाहरुख हुसेनने झारखंड येथील दुमका येथे जाळले, ती गंभीर जखमी झाली आहे. आरोपी शाहरुख हा पोलीस कोठडीत हसत होता. मात्र इंडिया टुडेने आरोपी शाहरुखचे नाव बदलून अभिषेक म्हणून का दाखवले?

(हेही वाचा हिजाब बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले)

तर अभिषेक सिंघवी म्हणाले, झारखंड येथील मुलगी अंकिता हिला शाहरुख याने पेट्रोल टाकून जाळून टाकले, ही केस माझ्या मते दुर्मिळातून दुर्मिळ असे आहे, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.