India-Pakistan Tensions : भारत विरोध आणि पलायन; पाक सेनापतींची दयनीय अवस्था!

67
India-Pakistan Tensions : भारत विरोध आणि पलायन; पाक सेनापतींची दयनीय अवस्था!
  • जयेश मेस्त्री

पाकिस्तान देशाची निर्मिती द्विराष्ट्र सिद्धांतानुसार झाली. हिंदू आणि मुसलमान दोन युद्धमान राष्ट्र आहेत हा सिद्धांत इस्लामी पंडितांनी मांडला होता. याचीच आठवण पाक सेनापती मुनीर यांनी पहलगाम हल्ल्यापूर्वी करुन दिली. भारत विरोध म्हणजेच हिंदू विरोध या तत्त्वावर पाकिस्तान उभे आहे. जर भारत विरोध पर्यायाने हिंदू विरोध केला नाही तर पाकिस्तान या राष्ट्राच्या निर्मितीचा उद्देश व त्याचा गाभा नष्ट होईल. त्यामुळेच पाकिस्तानी सेनापतींची कारकीर्द ही भारत विरोधावर टिकून असते आणि युद्धात किंवा प्रॉक्सी वॉरमध्ये पराभव झाला तर त्यांना पद सोडून पळावे लागते. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरमध्ये मजबूत मार खाल्ल्यानंतरही पाक पंतप्रधानांनी त्यांच्या आवामला संबोधित करताना आपण विजयी झालो आहोत असा आव आणला. या भाषणात त्यांनी पाक सेनापती मुनीर यांचीही स्तुती केली. म्हणजेच दोघांनी मिळून हा पराभव लपवला आणि आपले पद वाचवले आहे. याआधी भारतासोबत झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानी सेनापतींना पद सोडून पळावे लागले आहे. याचा आपण आढावा घेऊया… (India-Pakistan Tensions)

(हेही वाचा – Pakistani Spy : पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला हरियाणाच्या नूंहमध्ये अटक; ISIला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप)

जनरल अयुब खान (१९५१-१९५८, लष्करप्रमुख : १९५८-१९६९, राष्ट्राध्यक्ष)

अयुब खान यांनी १९६५ च्या भारत-पाक युद्धाची रणनीती आखली होती. या युद्धात पाकिस्तानला स्पष्ट विजय मिळाला नाही आणि ताश्कंद करारानंतर जनतेत नाराजी पसरली. युद्धातa अपेक्षित यश न मिळाल्याने आणि त्यानंतरच्या आर्थिक-सामाजिक अस्थिरतेमुळे त्यांच्यावरील दबाव वाढला. परिणामी १९६९ मध्ये जनआंदोलन आणि राजकीय अस्थिरतेमुळे अयुब खान यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले. अयुब खान यांची कारकीर्द भारताविरोधी युद्ध आणि काश्मीर धोरणावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून होती. मात्र यात त्यांना अपयश आल्याने त्यांचे पतन झाले. (India-Pakistan Tensions)

जनरल याह्या खान (लष्करप्रमुख : १९६६-१९७१; राष्ट्राध्यक्ष : १९६९-१९७१)

जनरतल याह्या खान यांच्या नेतृत्वात १९७१ चे भारत-पाक युद्ध झाले. युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. या युद्धात विजय मिळवणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. भारताविरोधी युद्ध हा यांच्या नेतृत्वाचा मुख्य आधार होता, पण पराभवामुळे लष्कराची प्रतिमा खराब झाली आणि देशांतर्गत दबाव वाढला. परिणामी, त्यांना लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष पद सोडावे लागले. (India-Pakistan Tensions)

(हेही वाचा – IPL 2025 : ‘थँक्यू आर्म्ड फोर्सेस’, राजस्थानविरुध्द पंजाब सामन्यात सैन्यदलांच्या शौर्याला सलाम)

लेफ्टनंट जनरल गुल हसन खान (१९७१-१९७२)

१९७१च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानचा पराभव आणि बांगलादेश निर्मिती यानंतर गुल हसन खान यांना लष्करप्रमुख बनवण्यात आले. मात्र, युद्धातील पराभवामुळे लष्कराची प्रतिमा खराब झाली होती आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्या नागरी सरकारने लष्करावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. गुल हसन यांचे भुट्टो यांच्याशी मतभेद झाले आणि युद्धानंतरच्या राजकीय पुनर्रचनेत त्यांना पद सोडावे लागले. अवघ्या काही महिन्यांत म्हणजे १९७२ मध्ये त्यांना लष्करप्रमुख पदावरून हटवण्यात आले. (India-Pakistan Tensions)

जनरल जिया-उल-हक (लष्करप्रमुख : १९७६-१९८८; राष्ट्राध्यक्ष : १९७८-१९८८)

जिया यांनी भारताविरोधात थेट युद्ध केले नाही, पण काश्मीरमधील बंडखोरीला पाठिंबा देणे, सियाचीन संघर्ष (१९८४) मधील रणनीती आणि भारताशी तणाव वाढवणारी धोरणे उदा. ऑपरेशन ब्रासटॅक्स, १९८६-८७ यामध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली. ते कट्टर इस्लामी म्हणून ओळखले जात. त्यांच्या कार्यकाळात जिहादी गटांना प्रोत्साहन मिळाले. भारतविरोधी भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. म्हणूनच ते दीर्घकाळ सत्तेवर होते. मात्र १९८८ मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाले. तात्पर्य भारतविरोधी यशस्वी धोरण राबवले तर पाक सेनापतींना सत्तेमध्ये अभय मिळतो. (India-Pakistan Tensions)

(हेही वाचा – Terrorist Abu Saifullah: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर कमांडर दहशतवादी अबू सैफुल्लाह ठार, अज्ञात हल्लेखोरांनी केली हत्या)

जनरल मिर्झा अस्लम बेग (लष्करप्रमुख : १९८८-१९९१)

मिर्झा अस्लम बेग यांच्या काळात काश्मीरमध्ये बंडखोरी तीव्र झाली आणि पाकिस्तानने गुप्तपणे जिहादी गटांना पाठिंबा दिला. १९९० चा काश्मीर तणाव आणि लष्करी धोरणांचे अपयश यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. भारतविरोधी भूमिकेत त्यांना अपयश येत होते असे त्यांच्या आवामला वाटू लागले. नागरी सरकार (नवाज शरीफ) आणि लष्करातील अंतर्गत मतभेद यामुळे म्हणजेच राजकीय तणावामुळे त्यांची कारकीर्द लवकर संपली. (India-Pakistan Tensions)

जनरल अशफाक परवेझ कयानी (२००७-२०१३)

कयानी यांच्या कार्यकाळात २००८ मुंबई हल्ला झाला. यामुळे त्यांची कारकीर्द स्थिर राहिली, कारण त्यांनी अंतर्गत राजकारण संतुलित ठेवले आणि त्यांचे अमेरिकेशी चांगले संबंध होते. कयानी हे आणखी एक उदाहरण आहे की भारतविरोधी भूमिकेत यश लाभले तर कारकीर्दीत यश लाभते. १९४७ पासून १५ लष्करप्रमुखांपैकी बहुतेकांनी भारताविरोधी धोरणे राबवली. काहींना यात यश आले तर काहींना अपयश. अपयश आले तर त्यांच्याविरोधात अंतर्गत संघर्ष वाढतो आणि पद सोडावे लागते. मात्र याला जनरल परवेझ मुशर्रफ अपवाद आहेत. त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धाची रणनीती आखली, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. युद्धात भारताने जबरदस्त उत्तर दिले. तरी देखील त्यांची कारकीर्द टिकून राहिली. विशेष म्हणजे २००१ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. २००१ मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाला. कदाचित म्हणून त्यांना अभय मिळाले असावे. त्यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. मात्र पुढे अंतर्गत राजकीय दबावामुळे त्यांना २००८ मध्ये सत्ता सोडावी लागली. अशाप्रकारे पाकिस्तानी सेनापतींचे भवितव्य भारतविरोधावर अवलंबून असते. इथे लक्षात ठेवले पाहिजे की भारतविरोध म्हणजे केवळ थेट युद्ध नव्हे. तर काश्मीर तणाव, प्रॉक्सी युद्ध म्हणजेच अतिरेकी कारवाया इत्यादी. आता पाहायचे आहे की मुनीर यांना या पराभवानंतर किती काळ अभय मिळते! (India-Pakistan Tensions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.