भारत जगभरातील ५२ टक्के प्लास्टिकचा कचरा निर्माण करणाऱ्या १२ देशांच्या यादीत

149
भारत जगभरातील ५२ टक्के प्लास्टिकचा कचरा निर्माण करणाऱ्या १२ देशांच्या यादीत
भारत जगभरातील ५२ टक्के प्लास्टिकचा कचरा निर्माण करणाऱ्या १२ देशांच्या यादीत

जगभरात प्लास्टिकचा कचरा वाढत असताना भारत ५२ टक्के जागतिक कचरा निर्माण करणाऱ्या पहिल्या १२ देशांच्या यादीत पोहोचला आहे. स्विझरलँड येथील कंसलटन्सी अर्थ एक्शन (ईए) या कंपनीने केलेल्या शोधातून ही माहिती समोर आली आहे. ईएने प्लास्टिक ओव्हरशूट डे अहवालात यंदाच्या वर्षांच्या अखेरीपर्यंत निसर्गात ६ कोटी ८६ लाख ४२ हजार ९९९ टन प्लास्टिक फेकले जाणार आहे. त्यात भारताकडूनही मोठ्या प्रमाणात निसर्गात प्लास्टिक फेकले जाण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली. जगात प्रत्येकजण २० किलो कचरा दरवर्षाला निर्माण करत असल्याचेही अहवालात सांगण्यात आले.

भारतासह चीन, ब्राझील, इंडोनेशिया, थायलंड, रशिया, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इराण आणि कझाकिस्तान या देशांना प्लास्टिकच्या कचऱ्याच्या गैरव्यवस्थापनासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. नुकतेच बिजिंग शहरातील पूर, भारतात सातत्याने वाढणारे पूर या नैसर्गिक आपत्तीत प्लास्टिकमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – माहीम मच्छीमार नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाचा प्रवास होणार सुलभ…)

प्लास्टिकमुळे पाण्याचा प्रवाह खंडतो, परिणामी पूरजन्य भागात परिस्थिती अधिकच चिघळते. वाढत्या प्लास्टिकचा फटका हिमनगांना बसतो आहे. हिमनग मोठ्या प्रमाणात वितळत असल्याने जागतिक बुडी बाबत पर्यावरणतज्ञांनी भीती व्यक्त केली. प्लास्टिक कचऱ्यातून प्रक्रिया करून पुनःनिर्मीती प्रकल्पाबाबत मोठ्या स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्लास्टिक कचरा याबाबतीत शासन स्तरावर प्रतिबांधत्मक आणि कडक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक असल्याची मागणी पर्यावरणतज्ञांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.