साथीच्या आजारांबरोबरच कोविड लसीकरणासाठी ‘घर घर दस्तक’

106

कोविड सोबत पावसाळ्यात येणारे जलजन्य आजारांचे आव्हान महापालिकेसमोर असले तरी‘घर घर दस्तक’ सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केली आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्यादृष्टीकोनातून मास्कचा नियमित वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईतील कोविड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी ३ जून २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

नियमांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक

या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. संजय ओक म्हणाले की, पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोविड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले असले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री प्रारंभापासून आजही नियमितपणे मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करतात. त्याचे पालन नागरिकांनी देखील करणे आवश्यक आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी कोविड सुसज्जतेसाठी खासगी रुग्णालयांची बैठक घेण्याची सूचना याप्रसंगी केली. त्यास अनुसरुन डॉ. गौतम भंसाली यांनी, कालच सर्व खासगी रुग्णालयां समवेत बैठक घेण्यात आली आहे. या सर्व रुग्णालयांच्या संचालकांना आवश्यक ते निर्देश देऊन कोविड सुसज्ज राहण्याविषयी सूचित करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : रविवार ५ जूनला मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक )

सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील कार्यपद्धती, कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार आकारावयाचे दर इत्यादींबाबत यापूर्वी निर्गमित केलेले आदेश पुन्हा एकदा प्रसारित करण्याची सुचनाही आयुक्तांनी महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांना केली. तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व आरोग्य व्यवस्थेमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तिंची कोविड चाचणी करण्याची व्यवस्था बाह्यरुग्ण सेवा विभागांमध्ये करण्यात यावी, अशी सुचनाही आयुक्तांनी केली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.