Britney Spears : सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पियर्स

128
Britney Spears : सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पियर्स

ब्रिटनी जीन स्पीयर्स (Britney Spears) ही एक अमेरिकन गायिका आणि नर्तकी आहे. तिचा जन्म २ डिसेंबर १९८१ रोजी मिसिसिपी येथे झाला आणि लुईझियाना येथे ती लहानाची मोठी झाली. ब्रिटनी स्पीयर्स पहिल्यांदा 1992 मध्ये स्टार सर्च या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दिसली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही.

१९९३ ते १९९४ या काळात डिस्ने चॅनल टेलिव्हिजन मालिका, (Britney Spears) द न्यू मिकी माऊस क्लबमध्ये तिने काम केले. १९९९ मध्ये तिने तिचा पहिला अल्बम ’बेबी वन मोअर टाईम’ रिलीज केला. जगभरात या अल्बमचे २५ दशलक्ष कॉपीज विकल्या गेल्या.

(हेही वाचा – IND vs Aus 4th T20 : भारताचा विजयी पराक्रम)

’उप्स! आय डिड इट अगेन’ या तिच्या दुसर्‍या अल्बमला (Britney Spears) देखील रसिकांनी डोक्यावर घेतलं. २००० मध्ये आलेल्या या अल्बमने तिला पॉप आयकॉन बनवले. २००१ मध्ये तिचा ब्रिटनी नावाचा अल्बम आला, २००३ मध्ये ’इन द झोन; हा अल्बम देखील चांगला चालला.

२००२ मध्ये तिने क्रॉसवर्ड्स या चित्रपटात काम केले. २००७ मध्ये आलेला ब्लॅकआउट्स (Britney Spears) हा तिचा अल्बम तिच्या अल्बमपैकी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हणतात. २००० च्या दशकातली ती सर्वोत्तम फीमेल अल्बम आर्टिस्ट होती. २०२१ मध्ये टाइमने 100 most influential people in the world म्हणून तिचा सन्मान केला. फोर्ब्सने म्हटले होते की ब्रिटनी ही सर्वात जास्त कमावणारी महिला संगीतकार आहे. ब्रिटनीच्या कारकिर्दीची घोडदौड अजूनही सुरु आहे. (Britney Spears)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.