Gulmohar Tree : गुलमोहराचे झाड; परंपरा, औषधी गुण आणि सौंदर्याचा अद्भुत मिलाफ 

246
Gulmohar Tree : गुलमोहराचे झाड; परंपरा, औषधी गुण आणि सौंदर्याचा अद्भुत मिलाफ 
Gulmohar Tree : गुलमोहराचे झाड; परंपरा, औषधी गुण आणि सौंदर्याचा अद्भुत मिलाफ 
गुलमोहर (Gulmohar Tree) हे साहित्यात अजरामर झालेले आणखी एक झाड आहे. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते तर गुलमोहर म्हणजे आनंदाचे प्रतीक होय! लाल फुले असलेले झाड मादागास्कर येथून भारतात आले. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात मादागास्करमध्ये हे झाड पाहिले होते.
गुलमोहराच्या(Gulmohar Tree) झाडाचे सौंदर्य त्याच्या फुलांमध्ये आहे. उन्हाळ्यात गुलमोहराची झाडे पानांऐवजी फुलांनी भरलेली असतात. जेव्हा त्यावर फुले फुलतात तेव्हा ते झाड पृथ्वीवरचे वाटत नाही तर जणू स्वर्गातलेच झाड वाटते.  या झाडाचा वापर बर्‍याचदा बाग आणि रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी केला जातो. गुलमोहरचे झाड भारतात अधिक आढळते. याचे इंग्रजी नाव (Flamboyant) किंवा (Royal Poinciana) असून त्याचे वनस्पतीजन्य नाव (Delonix Regia) आहे.
गुलमोहरची फुले (Gulmohar Tree) भारतातील ओलसर, दमट आणि उष्ण ठिकाणी सर्वाधिक फुलतात. सनातन धर्मात गुलमोहराचे फूल पवित्र मानले जाते. त्याचप्रमाणे गुलमोहरमध्ये आयुर्वेदातील अनेक औषधी गुणधर्म आहेत. गुलमोहराच्या झाडाची मुळे खूप मजबूत असतात. वादळही या झाडाला पाडू शकत नाही. जेव्हा या झाडाला फुले येतात तेव्हा त्यावर मोठ्या प्रमाणात मधमाश्या आणि फुलपाखरे दिसतात.(Gulmohar Tree)
गुलमोहराची लाल(Gulmohar Tree) फुले आणि शेंगा गोड, भूक वाढवणारी आणि पौष्टिक असतात. अशक्तपणा, तहान, जुलाब, नाकातून रक्त येणे, पांढरा स्त्राव, कावीळ, एनोरेक्सिया आणि मधुमेहावर फायदेशीर आहे. तर पिवळा गुलमोहर थंड, स्निग्ध आणि तिन्ही दोष कमी करणारा आहे. गुठळ्या, संधिवात आणि सायनसपासून मुक्तता प्रदान करते.
त्याच्या देठाच्या सालात रक्तस्त्राव थांबवण्याचा गुणधर्म असतो आणि पानांमध्ये सूज कमी करणारे, शीतल, लघवीचे प्रमाण वाढवणारे आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. फुले गोड, पौष्टिक, थंड आणि मृदू असतात. तसेच विविध रोगांवर उपचार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो.(Gulmohar Tree)
गुलमोहराचे झाड (Gulmohar Tree) खूप वेगाने वाढते. या झाडाची उंची एका वर्षात पाच ते आठ फुटांनी वाढते. तसेच हे झाड साधारण दहा ते बारा वर्षात ४० ते ५० फूट उंच होते. गुलमोहर झाडाचे आयुष्य सुमारे ५० ते ६० वर्षे असते.  कृष्णाचे कुमुट सजवण्यासाठी गुलमोहराच्य अफुलाचा वापर केला जातो म्हणून यास ’कृष्ण चूड’ असेही म्हणतात. (Gulmohar Tree)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.