GST Composition Scheme : जीएसटी कम्पोझिशन योजनेचा फायदा कसा घ्यायचा?

छोट्या उद्योजकांना जीएसटी कर भरणा सोपा जावा आणि त्यातील जटिलता कमी व्हावी यासाठी जीएसटी परिषदेनं कम्पोझिट योजना कार्यान्वित केली आहे.

216
GST Composition Scheme : जीएसटी कम्पोझिशन योजनेचा फायदा कसा घ्यायचा?

ऋजुता लुकतुके

जीएसटी परिषदेनं (GST Composition Scheme) अलीकडेच जीएसटी भरण्यासाठी असलेली वार्षिक उलाढालीची मर्यादा एका कोटीवरून दीड कोटी रुपयांवर आणून उत्पादकांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर सेवा पुरवठादारांनाही काही ठोस सवलती जाहीर केल्या. उद्योजकांचं करदायित्व कमी करण्याबरोबरच कर भरण्यातील सुलभताही नवीन नियमांमुळे वाढणार असल्याचा जीएसटी परिषदेचा दावा आहे.

(हेही वाचा – Govindgiri Maharaj : काशी – मथुरेचाही मार्ग लवकरच मोकळा होईल)

जीएसटी कम्पोझिट योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा घ्यायचा हे बघूया –

छोट्या उद्योजकांना जीएसटी कर भरणा (GST Composition Scheme) सोपा जावा आणि त्यातील जटिलता कमी व्हावी यासाठी जीएसटी परिषदेनं कम्पोझिट योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योजकांना दोन महत्त्वाचे फायदे मिळतात – कर दायित्व कमी होतं आणि कागदपत्रांची पूर्तताही सोपी होते.

तुमची मासिक उलाढाल एका ठरावीक मर्यादेत राहिली तर या योजनेचा (GST Composition Scheme) फायदा तुम्हाला घेता येतो. ही मर्यादा वेगवेगळ्या उद्योग व सेवांसाठी वेगवेगळी आहे. आणि ती जीएसटी परिषदेच्या साईटवर तपासून पाहता येते. उत्पादक आणि व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा वर्षाला दीड कोटी आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठीही ही मर्यादा वार्षिक दीड कोटी रुपये आहे. काही सेवांसाठी ही मर्यादा वार्षिक ५० लाख रुपये इतकी आहे. या मर्यादेच्या आतील लोकांना कम्पोझिट जीएसटीचा लाभ घेता येतो.

(हेही वाचा – Kunal Raut Congress : पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर काळं फासणं पडलं महागात ; कुणाल राऊत यांना अटक)

तो कसा घ्यायचा ते आता पाहूया,

तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी जीएसटीच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन (GST Composition Scheme) अर्ज करावा लागतो. तिथे जीएसटी सीएमपी -०२ हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. जीएसटी वेबसाईटवर करदात्यांच्या इंटरफेसवर गेलात की, तिथे सर्व्हिसेस या सदरात रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केलंत की, ॲप्लिकेशन हा पर्याय निवडायचा आहे. मग वर उल्लेख केलेला अर्ज समोर येईल. तो भरलात की, कम्पोझिट जीएसटीसाठी अर्ज करण्याची तुमची तयारी असल्याचं धरलं जाईल. आणि चालू आर्थिक वर्षासाठी तुम्हाला कम्पोझिट योजना लागू होईल.

त्यामुळे ज्या वर्षी तुम्हाला कम्पोझिट योजनेचा (GST Composition Scheme) फायदा घ्यायचा आहे, त्याच वर्षात हा अर्ज भरणं आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षातील व्यवहरांचा फायदा पुढील वर्षात तुम्हाला मिळणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.