Savarkar Strategic Center : …तोपर्यंत जम्मू-काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवा; सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचा ठराव

लडाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारत सरकारने प्राधान्याने पुढाकार घ्यावा.

65
Savarkar Strategic Center : ...तोपर्यंत जम्मू-काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवा; सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचा ठराव
Savarkar Strategic Center : ...तोपर्यंत जम्मू-काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवा; सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचा ठराव

नियंत्रण रेषा पूर्णतः सुरक्षित होईपर्यंत भारत सरकारने जम्मू आणि काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवावा, असा ठराव सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरमार्फत शनिवारी करण्यात आला. (Savarkar Strategic Center)

सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवारी, २१ ऑक्टोबरला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कॅप्टन संजय पराशर, कॅप्टन सिकंदर रिझवी यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आदी उपस्थित होते. यावेळी सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरतर्फे दोन ठराव मंजूर करण्यात आले. (Savarkar Strategic Center)

(हेही वाचा – Navaratri 2023 : गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा हार्टअटॅकने मृत्यू)

लडाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारत सरकारने प्राधान्याने पुढाकार घ्यावा. तसेच लडाखमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंसाठी विधानभवनाची निर्मिती करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा, असा पहिला ठराव सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे समन्वयक विनायक काळे यांनी मांडला. त्याला ब्रिगेडियर हेमंत महाजन, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी अनुमोदन दिले. (Savarkar Strategic Center)

त्याचप्रमाणे, नियंत्रण रेषा पूर्णतः सुरक्षित होईपर्यंत जम्मू आणि काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवावा. शिवाय पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे, असा दुसरा ठराव सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे समन्वयक विनायक काळे यांनी मांडला. त्याला कॅप्टन सिकंदर रिझवी आणि लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा यांनी अनुमोदन दिले. (Savarkar Strategic Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.