खवय्यांसाठी आनंदाची बातमी; प्रसिद्ध Chitale बंधूंची बाकरवडी आता ‘मिनी’ रूपात!

48
खवय्यांसाठी आनंदाची बातमी; प्रसिद्ध Chitale बंधूंची बाकरवडी आता 'मिनी' रूपात!
खवय्यांसाठी आनंदाची बातमी; प्रसिद्ध Chitale बंधूंची बाकरवडी आता 'मिनी' रूपात!

Chitale : आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर ग्राहकाच्या मनावर गेली ७५ वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू (Chitale Bandhu) आपली जगप्रसिद्ध बाकरवडी (Chitale Bakarwadi) आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेच्या या खमग बाकरवडीचे हे नवे ‘मिनी’ रूप खवय्याच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे. (Chitale)

सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूनी ही ‘मिनी बाकरवडी’ सादर केली आहे. मिनी बाकरवडीच्या प्रसिद्धीसाठी तीन नव्या जाहिरातीही प्रदर्शित करण्यात आल्या असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ व आयुष मेहरा याच्यावर चित्रित झालेल्या या जाहिरातीमध्येही क्रिकेट आणि आयपीएलवर विशेष भर देण्यात आला आहे. गेट मंच रेडी विथ चितळे बाकरवडी’ अर्थात ‘आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच’ असा संदेश या जाहिरातीमधून देण्यात आला आहे.

(हेही वाचा – bandra station : महाराष्ट्रातलं तिसरं व्यावसायिक केंद्र; वांद्रे आहे कलाकारांची नगरी!)

मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमीचा आयपीएल (IPL) सामन्याचा धरार अधिक रोमाचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, “आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघामध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थान त्याना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूच्या या नव्या मिनी बाकरवडीसीबत आम्ही क्रिकेटरसिकाच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे व जाहिरातींमुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूंचे भागीदार केदार चितळे म्हणाले.

(हेही वाचा – Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिरातल्या शिवलिंगाचा शोध लावला होता एक गाईने! विश्वास बसत नसेल तर हा लेख वाचा)

चितळे बंधू सध्या ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासोबत ते ‘सॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडले गेले आहेत. अशातब ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे हे विशेष.

चितळे बंधूबद्दल थोडक्यात

१९७६ साली, चितळे बंधूनी महाराष्ट्रातील खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ (food) बाकरवडी सादर केली, जी अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या अनोख्या चवीच्या पदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन, १९९६ मध्ये चितळे बंधूनी भारतात पहिल्यांदाच यंत्राच्या सहाय्याने बाकरवडी तयार करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. यामुळे दर्जा आणि चव यामध्ये सातत्य राखले गेले आणि बाजारपेठेची वाढती मागणी पूर्ण करता आली.

पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते अमेरिका, युरोप, आखाती देश आणि त्यापलीकडेही अनेक घराघरांपर्यंत, चितळे बंधू आणि चितळे बंधू अमेरिकाज हे नाव आता अनेक सण-उत्सवांचं अविभाज्य घटक बनलं आहे. गोड पदार्थांपासून ते तिखट-चविष्ट खाद्यपदार्थांपर्यंत, २५० हून अधिक विविध उत्पादनांची पर्वणी ग्राहकांना उपलब्ध आहे.

(हेही वाचा – PSL vs IPL : रमीझ राजांनी जेव्हा पीएसएलचा जाहीर उल्लेख आयपीएल असा केला…)

चितळे बंधूच्या गौरवशाली वाटचालीकडे मागे पाहत असतानाच, कंपनीने भविष्याकडे लक्ष केंद्रित केले आहे- उत्तम दर्जाची उत्पादने आणि खाद्यानुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या वचनासह। सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत सुरू झालेला ७५ वर्षांचा अमृतमहोत्सव हा चितळे बंधूंची परंपरा आणि आधुनिकता या संगमातला नवा अध्याय आहे, जो कंपनीच्या पुढील यशस्वी प्रवासाची सुरुवात करतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.