गणेश आगमनाच्याच दिवशी मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, भाविक संतप्त

98

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशाचे आगमन झाले आहे. परंतु सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. ऐन गणेशोत्सवात मंदिरात सोन्याचा कळस चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोन्याचा कळस दुस-यांदा चोरीला गेल्याने, भक्तगण संतप्त झाले आहेत. यापूर्वी 2017 साली देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता.

सोलापूर- तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपतीची स्थापना केली होती. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनगाव पतंगे मंगळवारी पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

( हेही वाचा: स्वतंत्रपूर्व काळापासून विविध जातीच्या लोकांना एकत्र आणणारा बारभाई गणपती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.