Gharvapasi : मंदिरांबाहेर ‘इथे घर वापसी केली जाईल’, असे बोर्ड लावण्याचे आवाहन

168
Gharvapasi : मंदिरांबाहेर 'इथे घर वापसी केली जाईल', असे बोर्ड लावण्याचे आवाहन

देशात ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे आता हिंदूंनाही विस्तारवादी बनावे लागणार आहे. मोठ्या संख्येने हिंदूंनी (Gharvapasi) घरवापसीचे कार्यक्रम घेतले पाहिजेत. मंदिरांबाहेर ‘इथे घरवापसी केली जाईल’, असे बोर्ड लावले पाहिजेत. मंदिरांमधून कमीत कमी वेळेत घरवापसी करण्यासाठी तशी कार्यपद्धती तयार केली पाहिजे, असे आवाहन शरयु ट्रस्ट, दिल्लीचे अध्यक्ष राहुल दीवान यांनी केले.

गोवा येथे श्री रामनाथ देवस्थान येथे आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे चौथे पुष्प गुंफण्यात आले. सोमवार, १९ जून या चौथ्या दिवसाच्या प्रारंभी ‘धर्मांतर, घरवापसी (Gharvapasi) आणि कठुआ सत्य’ या विषयावरील पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल दीवान हे घरवापसी या विषयावर बोलत होते.

(हेही वाचा – आदिपुरुष : थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, प्रेक्षकांच्या टीकेनंतर निर्मात्यांना जाग)

मुसलमान कट्टर असतात, सरकार मदत करणार नाही, अशी कारणे देत हिंदू संघटनांनी घर वापसीसारख्या (Gharvapasi) मुद्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. आता हिंदू रक्षणासाठी एकच उपाय उरला आहे. मोठ्या संख्येने घरवापसी करायची असेल तर हिंदूंना मिशनरी बनावे लागेल. आदी शंकराचार्यही मिशनरी होते. १० कोटी मुसलमानांना पुन्हा हिंदू बनवण्याचे कार्य करावे लागेल, असेही राहुल दीवान म्हणाले.

आता एक्स मुस्लिमांची संख्या वाढू लागली आहे. केरळात एक्स मुसलमानांची संख्या वाढत आहे. अमेरिका, कॅनडा येथेही अशा मुसलमानांची संख्या वाढू लागली आहे. कॅनडात एका मौलवीने तर एक्स मुसलमानांची सुनामी येत आहे, अशी कबुली दिली होती. त्यामुळे आता हिंदूंनी या दृष्टीने प्रयत्न सुरु करावेत. मंदिराबाहेर घरवापसी (Gharvapasi) करून घेण्याविषयी बोर्ड लावले जावेत. त्यासाठी समान कार्यपद्धत राबवावी. इको सिस्टम बनवावी. वकील संघटना उभी करावी. निधी उभा करावा. जेथे हनुमान जयंतीसाठी लाखो हिंदू एकवटू शकतात, तिथे घरवापसीसाठी हिंदू निधी देणार नाहीत का, टोल फ्री नंबर तयार करा, घरवापसी करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये स्पर्धा लागली पाहिजे, असेही दीवान म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.