पुण्यात ३ कोटींचा दरोडा टाकणारे गजाआड

120

शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून ३ कोटी ६० लाख रुपये लुटून दरोडेखोर पळून गेले होते, या दरोडेखोरांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आंगडीया कंपनीच्या वाहनातून ही लूट करण्यात आली होती.

१ कोटी ४३ लाख २० हजार रूपये जप्त केले

या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके शोध लावत होते. पोलिसांच्या पथकाने सागर शिवाजी होनमाने याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम आणि रजत अबू मुलाणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तपासात सागर होनमाने याकडून ७२ लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडून ७१ लाख २० हजार रूपये असे एकूण १ कोटी ४३ लाख २० हजार रूपये जप्त केले आहेत.

(हेही वाचा ट्वीन टॉवर प्रमाणेच चांदणी चौकातील पूलही पडणार)

राजस्थान येथून ताब्यात घेतले

त्यादरम्यान अटक प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी गौतम अजित भोसले (वय 33 वर्षे, रा.वेने, ता. माढा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (वय 26 वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि. पुणे), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय 25 वर्षे, रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि.पुणे) यांना राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.