संशोधनामुळे चिंतेत भर; बर्फाच्या चादरीखाली सापडली 460 किमी लांबीची नदी

89

पर्यावरणाची हानी होत असताना पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता पूर्णपणे बर्फाच्छादित अंटार्क्टिकातील बर्फाच्या स्तराखाली तब्बल 460 किलोमीटर लांबीची हिमनदी वाहत असल्याचे पुरावे संशोधकांना सापडल्याने चिंतेत भर पडली आहे.

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फाच्छदित प्रदेशातील बर्फ वितळण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे, यातून सिद्ध झाले आहे. अंटार्टिकातील बर्फाच्या चादरीखाली काय घडामोडी घडत आहेत, याचा अभ्यास संशोधक अनेक दशकांपासून करत आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत संशोधकांनी अंटार्टिकामधील तलावांना जोडणा-या पाण्याच्या सखल वाहिन्यांचे चित्र रंगवण्यास सुरुवात केली आहे. प्रथमच अंटार्क्टिकाखालील बर्फाच्या नदीचे थेट सर्वेक्षण केले. बर्फाच्या चादरीखाली छिद्र करुन खाली एका अरुंद प्रवाहाची झलक त्यांना मिळाली.

( हेही वाचा: महाराष्ट्रात २ हजार कोटींची गुंतवणूक येणार; इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर )

वेगवान प्रवाहामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढले

सिर्गट आणि त्याच्या सहका-यांनी बर्फाच्या स्तराखाली हायड्रोलाॅजी आणि एअरबोर्न रडार सर्वेक्षणाच्या माध्यमातून 460 किलोमीटरची नदी उघडकीस आणली आहे. त्यांना दिसून आले की, ही नदी बर्फाच्या स्तराखालून मार्ग काढत समुद्राला मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.