महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

110

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. महापौरांनी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला.

( हेही वाचा : प्रजासत्ताक दिनी राजपथावर पहा देशाचे सामर्थ्य, यंदाचे संचलन आहे खास ! )

याप्रसंगी उप महापौर अँड.सुहास वाडकर, विशाखा राऊत, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्दा जाधव, महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प ) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी तसेच सह- आयुक्त सर्व अजित कुंभार, मिलिन सावंत, चंद्रशेखर चौरे, उप आयुक्त प्रभात रहांगदळे, रमाकांत बिरादार, संजोग कबरे, चंदा जाधव, संजय कुऱ्हाडे, सुनिल गोडसे, अजय राठोर तसेच महापालिका चिटणीस (प्रभारी) संगीता शर्मा, खातेप्रमुख, महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

पुष्पगुच्छ देऊन सत्कार

बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर , प्रमुख अग्निशामक संजय म्हामुणकर, सुरेश पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक, जाहीर करण्यात आले. त्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी , भायखळा येथील महापौर निवासस्थानी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज सकाळी ७.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ए, बी व ई प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थाानिक नगरसेवक रमाकांत रहाटे तसेच ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळंजु तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.