पहिली ’रोमन महाराणी’ Agrippina the Younger : महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व

58
अग्रिपिना द यंगर (Agrippina the Younger) एक महत्वाकांक्षी, शक्तिशाली आणि चलाख स्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. खरं पाहता प्राचीन रोम हे क्रौर्य, कपट या सर्व दुर्गुणांनी भरलेलं होतं. अग्रिपिना द यंगर म्हणजेच जुलिया अग्रिपिनाचा जन्म ६ नोव्हेंबर एडी १५ मध्ये झाला. लष्करी नेता जर्मेनिकस हे तिचे वडील होते आणि आई अग्रिपिना द एल्डर (सम्राट तिबेरियसची सावत्र मुलगी). तिची आई सत्तावादी होती, जणू ती तिच्या आईची सावलीच होती.
तिचे वडील जर्मनिकस हे दुसरा सम्राट तियबेरियसचे पुतणे आणि वारस होता. अग्रीपिनाचा भाऊ कॅलिगुला एडी ३७ मध्ये सम्राट झाला. ४१ एडी मध्ये कॅलिगुलाची हत्या झाल्यानंतर, जर्मनिकसचा भाऊ क्लॉडियस सिंहासनावर विराजमान झाला. अग्रिपिनाने एडी ४९ मध्ये क्लॉडियसशी लग्न केलं.
अग्रिपिनाने (Agrippina the Younger) रोमन साम्राज्याची दोर हाती घेतली. मात्र तिने सर्व हालचाली पडद्यामागूनच केल्या. अतिसय चलाखीने तिने आपल्या मुलाला म्हणजेच नीरो ला उत्तराधिकारी केलं. ’रोम जळत होता तेव्हा नीरो फिडल वाजवत होता. ही म्हण प्रसिद्ध आहे.  क्लॉडियसला तिच्या कारास्थानाबद्दल खबर लागली, तो ५४ व्या वर्षी मृत झाला. असं म्हणतात की अग्रिपिनानेच त्याला विष देऊन मारलं.
रोमचा इतिहास पाहिला तर अग्रिपिना द यंगर ही एक शक्तिशाली महिला तर होती, मात्र त्याचबरोबर क्रूर, कपटी आनी हुकुमशाही देखील होती. ती अतिशय सुंदर होती. मात्र राजेशाही सौंदर्यामागे एक भयानक रुप लपलं हितं. आपला मुलगा सत्तेत आल्यावर तिने सत्ता चालवली खरी. पण हळूहळू नीरोला तिचं वागणं खटकू लागलं.
रोमन इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते नीरोची आई हुकुमशाही होती. तिने नीरोला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की तिचे मुलासोबतच लैंगिक संबंध होते. इतिहासात ही अफवा म्हणूनच प्रसिद्ध आहे. तरी असं म्हणतात की जेव्हा नीरोने आपल्या आईला मारण्यासाठी मारेकरी पाठवले तेव्हा ती गर्भवती होती आणि हे बाळ नीरोचचं होतं असंही म्हटलं जातं. अग्रिपिना द यंगर आयुष्यभर कपट करुन जगली आणि तिचा शेवटही अगदी तसाच झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.