Fighter Plane Crashes In Jaisalmer: भारत शक्ती युद्धाभ्यासदरम्यान जैसलमेरमध्ये लढाऊ विमान कोसळले

पोखरणमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यास ठिकाणापासून सुमारे 100 किमी अंतरावर हा अपघात झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

187
Fighter Plane Crashes In Jaisalmer: भारत शक्ती युद्धाभ्यासदरम्यान जैसलमेरमध्ये लढाऊ विमान कोसळले
Fighter Plane Crashes In Jaisalmer: भारत शक्ती युद्धाभ्यासदरम्यान जैसलमेरमध्ये लढाऊ विमान कोसळले

भारत शक्ती युद्धाभ्यासदरम्यान जैसलमेरमध्ये (Fighter Plane Crashes In Jaisalmer) लढाऊ विमान कोसळले. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या भिल्ल समाजाच्या वसतिगृहात विमान घुसले होते.

घटनेच्या वेळी त्या खोलीत कोणीही नव्हते. त्यात २ पायलट असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात होण्यापूर्वी दोघेही बाहेर आले होते. अपघातानंतर विमानाचा ढिगारा घराच्या भिंतीवर आदळला. अचानक झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली.

पोखरणमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यास ठिकाणापासून सुमारे 100 किमी अंतरावर हा अपघात झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विमानात दोन पायलट असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातापूर्वी दोघेही बाहेर पडले. अपघातानंतर विमानाचा काही मलबा जवळच्या घरावर पडला. अचानक झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली. घटनेच्या वेळी विमान रिकामे असल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही.

(हेही वाचा – Bangladeshi Arrested : सीएए कायदा लागू झाल्यानंतर नवी मुंबईमधून ८ बांगलादेशी नागरिकांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.