प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन

106

प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडित बिरजू महाराज यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते 83 वर्षांचे होते. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पंडित बिरजू महाराज यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मागील महिन्याभरापासून पंडित बिरजू महाराजांवर उपचार सुरू होते. रविवारी रात्री 12:15 ते 12:30 वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुढील 10 मिनिटात त्यांना दिल्लीच्या साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती बिरजू महारांची नात प्रसिद्ध कथ्थक वादक रागिणी महाराज यांनी दिली.

(हेही वाचा -१९९३ च्या स्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा पाकिस्तानात मृत्यू )

गायक अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान सामीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालं. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेनं अनेक पिढ्यांना प्रभावित केलं आहे.

पंडित बिरजू महाराज यांच्याबद्दल…

पंडित बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला होता. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. बिरजू महाराजांनी गेली अनेक वर्ष शास्त्रीय नृत्यात विशेष: कथ्थक नृत्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. लखनऊ घराची विशेषता त्यांनी त्यांच्या नृत्यातून आजवर जपली. त्यांच्या जाण्याने शास्रीय नृत्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक प्रसिद्ध शास्रीय नृत्य कलाकारांनी महाराजांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.