दिल्लीसह उत्तरभारतात भूकंपाचा धक्का! ६.६ रिश्टर स्केल तीव्रता; केंद्र अफगाणिस्तान

94

गेल्या काही दिवसांपासून जगभरात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत. आता अफगाणिस्तान पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचा धक्के जाणवले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के ६.६ रिश्टर स्केल इतके होते. सुमारे १० सेकंद जमीन हादरत राहिल्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान लडाखमध्ये देखील २३ सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये होते.

( हेही वाचा : Gudi Padwa 2023 : यावर्षीच्या गुढीपाडव्याची वैशिष्ट्ये ! )

भूकंपाची खोली १५६ किमी

दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. या भूकंपाच्या धक्क्यानंतर सर्व नागरिक आपल्या घरातून बाहेर आले. रात्री १० वाजून १७ मिनिटांनी हा भूकंपाचा पहिला धक्का बसला. दिल्लीसह तुर्कमेनीस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान या देशांनाही या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे. या भूकंपाची खोली १५६ किमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याचे केंद्र हिंदूकूश पर्वतरांगेमध्ये आहे. त्यामुळेच याचा धक्का अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान या देशांना बसल्याची माहिती आहे. या भूकंपाची ७१.०९ अशांवर नोंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये नऊ नागरिकांचा मृत्यू 

दरम्यान यामुळे पाकिस्तानमध्ये नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी दिली आहे. दिल्ली-एनसीआरमधील उंच इमारतींमध्ये लोक प्रचंड घाबरले आहेत. लोक त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये यावर्षी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.