Dwarka Temple History : द्वारका मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

द्वारका हे एक पौराणिक शहर आहे, ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. द्वारका हे नाव संस्कृत शब्द ‘द्वार’ वरून आले आहे ज्याचा अर्थ आहे, द्वार. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूने त्याने बांधलेले शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत.

114
Dwarka Temple History : द्वारका मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

भगवान श्रीकृष्ण, ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो, राजकीय गुरु मानतो. त्या भगवंतांची नगरी म्हणजे द्वारका. असं मानले जातं की द्वारका ही नगरी श्रीकृष्णाने स्थापन केली होती. यदुवंशींना मथुरेतून आणलं आणि द्वारकेत एक समृद्ध शहर वसवलं आणि आपली राजधानी बनवली. इथे बसून कृष्णाने देशाची सूत्रे हातात घेतली. उत्तरेत थेट राज्य करण्याऐवजी आपल्या मर्जीतले पांडव बसवले. मोठमोठे राजे येथे येऊन अनेक बाबतीत भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेत असत. कृष्णाने तर भीष्मांनाही शह दिला. भीष्म त्याकाळचे सर्वात मोठे राजकीय नेते होते. मात्र कृष्णाच्या बुद्धीपुढे त्यांनाही नमावं लागलं. (Dwarka Temple History)

द्वारका हे एक पौराणिक शहर आहे, ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. द्वारका हे नाव संस्कृत शब्द ‘द्वार’ वरून आले आहे ज्याचा अर्थ आहे, द्वार. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूने त्याने बांधलेले शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. पुराणांमध्ये द्वारकेच्या पवित्र ठिकाणी नागेश्वर महादेव नावाचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रकाश स्तंभ असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे. (Dwarka Temple History)

आता ज्या ठिकाणी कृष्णाचा ‘हरि गृह’ नावाचा राजवाडा होता. तिथे आज प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे. असे मानले जाते की मूळ मंदिर भगवान श्रीकृष्णाचा पणतू व्रजनाभ याने बांधले होते. द्वारकेचे प्राचीन नाव कुशस्थली असे होते. पौराणिक कथेनुसार, महाराजा रैवतक यांनी समुद्रात कुश पसरवून यज्ञ केल्यामुळे या शहराचे नाव कुशस्थळी पडले. शहराच्या एका भागाभोवती एक भिंत सीमा म्हणून तयार करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सर्व मोठी मंदिरे आहेत. मात्र या शहरातील मूळ मंदिरे १३७२ मध्ये दिल्लीच्या जिहादी शासकांनी नष्ट केली. (Dwarka Temple History)

द्वारकाधीश मंदिराचा इतिहास

कृष्णाने कंस मामाचा वध केला. त्यानंतर कृष्णाचा सासरा मगधचा राजा जरासंधाने १७ वेळा मथुरेवर आक्रमन केलं. सतत आक्रमण होत असल्यामुळे आणि सामान्य रयतेला त्रास होत असल्यामुळे कृष्णाने आपली राजधानी दुसरीकडे वसवण्याचा निर्णय घेतला. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे वास्तुविशारद विश्वकर्मा यांनी समुद्रातून एक तुकडा पुन्हा प्राप्त करुन गोमती नदीच्या काठावर शहर वसवले. त्यावेळी द्वारकेला सुवर्ण द्वारका म्हणून ओळखले जात असे. (Dwarka Temple History)

द्वारवती आणि कुशस्थली विकसित क्षेत्रे होते, ज्यात रुंद रस्ते, निवासी घरे आणि व्यावसायिक क्षेत्रे, राजवाडे आणि अनेक सार्वजनिक व पायाभूत सुविधांचा समावेश होता. ‘सुधार्मिक सभा’ नावाच्या एका विशाल सभागृहात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात येत असे. इथले बंदर चांगले होते, म्हणून हे शहर एक मोठे व्यापार केंद्र होऊ शकले आणि या शहरात सोने, चांदी आणि रत्ने होती आणि सात लाख राजवाडे होते. तसेच उद्यान आणि तलावांचा समावेश होता. विकसित भारताचे स्वप्न कृष्णाने त्या काळी सत्यात उतरवून दाखवले होते. (Dwarka Temple History)

(हेही वाचा – Tesla in India : टेस्ला कंपनी भारतात जागा पक्की करण्यासाठी एप्रिलमध्ये पाठवणार पाहणी चमू)

जगत मंदिर

४८ मीटर उंचीवर समृद्ध नक्षीकाम केलेले मिनार असलेले पाच मजली प्राचीन मंदिर. ३२ किमी अंतरावरील शंखद्वार बेटावरील प्रसिद्ध रणछोडरायजी मंदिर आणि मत्स्यवतार मंदिर; गोपी तलाव आणि द्वारकावन यांचा समावेश आहे. रणछोड मंदिरापासून दीड मैल चालल्यावर शंख तलाव आहे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याच्या काठावर शंख नारायणाचे मंदिर आहे. शंख तलावात स्नान करून शंख नारायणाचे दर्शन घेणे पुण्याचे मानले जाते. याशिवाय तीर्थक्षेत्रांमध्ये गोमती द्वारका, निश्पाप कुंड, परिक्रमा, दुर्वासा आणि त्रिविक्रम मंदिर, कुशेश्वर मंदिर इत्यादींचा समावेश आहे. (Dwarka Temple History)

वाचकहो, संशोधकांनी पुराणांमध्ये वर्णन केलेले द्वारकेचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. २००५ मध्ये द्वारकेचे रहस्य उलगडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये भारतीय नौदलानेही मदत केली. या मोहिमेदरम्यान समुद्राच्या खोलात कापलेले दगड सापडले आणि येथून सुमारे २०० इतर नमुनेही गोळा करण्यात आले. मात्र अजून निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. आजही इथले शास्त्रज्ञ स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या खोलात दडलेले रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Dwarka Temple History)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.