जंगलाच्या रखवालदाराचा सन्मान हवा…

116

चंद्रपूरात दर महिन्याकाठी वन्यजीवांच्या हल्ल्यात माणसांचा बळी जात आहे. विदर्भात माणसांएवढीच वन्यप्राण्यांची वाढती संख्या हा चिंताजनक विषय होऊ लागला आहे. ३ वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर संतप्त जमावाने काल सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या टीमला डांबवून ठेवले. बिबट्याला गोळी घालण्याचे आदेश जाहीर होईपर्यंत सहा तास त्यांची सुटका झाली नाही. परंतु वनाधिका-यांनाच थेट आरोपींच्या पिंज-यात डांबवण्याचा प्रकार थांबायला हवा, अशी मागणी वनविभागातील ज्येष्ठ आणि माजी वनाधिका-यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केली.

वनाधिकाऱ्यांविरुद्ध केलेले कृत्य योग्य नाही

आयपीएस अधिका-यापेक्षाही जंगलाचे संरक्षण करणा-या वनाधिका-याचे जीवन तेवढेच खडतर असते. वनाधिका-यांवर हल्ला करणे, त्यांना डांबणे या कृत्यांना पाठिंबा देत नाही, असे वक्तव्य राज्य वनविभागाचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिली. २४ तास वनसेवेसाठी बांधील कार्यात जंगलात प्रत्येक घडामोड जाणून घेण्यापासून ते जंगलातील अपरिहार्य गोष्टींचा शोध लावणे, केस नोंद करणे, तपास करणे हे सर्व काम वनाधिका-यांनाच करावे लागते.

जंगल असो वा प्रादेशिक वनविभाग रात्रीची टेहाळणी करुन सर्व घडामोडींवरही वनाधिका-यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. शहरांत प्राणी घुसला तरीही त्याच्या व माणसांच्या बचावासाठी वनाधिका-यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अशा आव्हानात्मक परिस्थितीला नियंत्रणात आणेपर्यंत वनाधिकारी घटनास्थळीच राहतात. शहर किंवा जंगलात वन्यजीवांच्या तस्करी, शिकारीच्या घटनांचा मागोवा घेणे, तपास पूर्ण करणे, इथपासून ते जंगलातील झाडांवरील पाने, फळे, फुले आदी नैसर्गिक घटकांचा सांभाळ करण्यापर्यंत वनाधिका-यांची मोलाची भूमिका असते. हल्लेखोर प्राण्याला पकडण्यासाठीही वनविभाग पूरेपूर प्रयत्न करत असते. परंतु त्यांच्यावरच उलटा हल्ला होत असेल तर स्थानिकांचे वनाधिका-यांच्या विरोधातील कृत्य योग्य नसल्याचे काकोडकर म्हणाले.

( हेही वाचा : आता गुगल ट्रान्सलेटरवर संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषेचाही समावेश )

शहरीजीवनमानापासून दूर जंगलात वनसेवा देताना कित्येकदा कुटुंबाची साथ सुटते. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मूळ कुटुंब शहरात राहते. धकाधकीचे काम आटोपून आल्यानंतरही सोबतीला कित्येकदा कुटुंबही नसते. चंद्रपूरसारखा आता वन्यप्राणी संघर्षातील भूभाग असो वा यवतमाळमधील पांढरकवडा येथील अवनी वाघीणीचे प्रकरण, वनाधिका-यांना राजकीय दबाव, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. यवतमाळमध्ये २० वर्ष वाघाचे दर्शन झाले नव्हते. अचानक एक वाघीण आपल्या बछड्यांसह तिथे राहायला आली. तिचा पांढरकवड्यातील वावर, गुरांवरचे वाढता हल्ला, माणसांवर झालेला हल्ला हे सर्व काही तिथल्या स्थानिकांनी पहिल्यांदा पाहिले होते. मात्र संघर्ष परिस्थितीत राजकारणी किंवा स्थानिक नेत्यामुळे परिस्थिती बिघडते, अशी टीका काही माजी वनाधिका-यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.