Deven Bharti स्वीकारणार मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार

124
मुंबई Bangladeshi Infiltrators पासून मुक्त करणार; नव्या आयुक्तांचे फर्मान

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील महत्वाचे मानले जाणारे मुंबई पोलीस आयुक्तपदी १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी (IPS officer) देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे बुधवारी सायंकाळी मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्या कडून मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) हे बुधवारी सेवानिवृत्त होत आहे, गेली ३५ वर्षीय पोलीस दलात सेवा देणारे विवेक फणसळकर यांच्या सेवानिवृत्ती नंतर रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदी १९९३ बॅचचे जेष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते, अर्चना त्यागी (Archana Tyagi) आणि १९९४ बॅचचे जेष्ठ आयपीएस आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा तिढा सुटला.

(हेही वाचा – Protected Monuments : राज्यभरातील 389 संरक्षित स्मारकांवर आता प्री-वेडिंग शूटिंगसह धार्मिक कार्यक्रमांना बंदी ; दंडदेखील ठोठावला जाणार)

राज्य सरकारने महत्वाचे मानले जाणारे मुंबई आयुक्त पदी १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सांयकाळी मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील.

मुंबई चे नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा अल्पपरिचय…

१९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती सुमारे ५४ वर्षांचे आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन ९ आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा आणि त्यानंतर सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर ते होते. ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते. महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती.

१९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती (Deven Bharti) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय समजले जातात. वर्ष २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.