मुंबई विमानतळावर ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर्स जप्त, तिघांना अटक

96

मुंबई विमानतळावर ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलरसह तिघांना अटक करण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या डॉलरची भारतीय चलनात ४ कोटी १० लाख एवढी किंमत आहे. अटक करण्यात आलेले तिघे एकाच कुटुंबातील असून साडीची घडी आणि लहान मुलांच्या बुटातून हे डॉलर दुबई येथे घेऊन जात असताना त्यांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – प्रताप सरनाईक पुन्हा ED च्या रडारवर? 11 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार)

मुंबई विमानतळावरून दुबई येथे निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन भारतीय नागरिकांच्या सामानाची तपासणी सुरू असताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याना संशय आला. यानंतर या प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली असता बॅगेत असलेल्या साडीच्या घडीमध्ये दडवून ठेवलेले अमेरिकन डॉलर सापडले, त्याच बरोबर लहान मुलाच्या बुटामध्ये डॉलर्स सापडले आहेत.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक

सीमा शुल्क विभागाने सुमारे ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहे, जप्त करण्यात आलेले अमेरिकन डॉलर्सची भारतीय चलनात ४ कोटी १० लाख एवढी किंमत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत सीमाशुल्क विभागाने एकाच कुटुंबातील दोन जेष्ठ नागरिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.