Costa Serena Cruise : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत क्रूझ प्रवासाला हिरवा झेंडा

200
Costa Serena Cruise : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत क्रूझ प्रवासाला हिरवा झेंडा

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतून भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज ‘कोस्टा सेरेना’ (Costa Serena Cruise) क्रूझला हिरवा झेंडा दाखवून क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा आरंभ केला.

“कोस्टा क्रूझच्या (Costa Serena Cruise) देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग असून जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “देखो अपना देश” या उपक्रमाशी सुसंगत आहे, असे सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.

भारताने जलपर्यटन क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मोठा आर्थिक सकारात्मक प्रभाव, रोजगार निर्मितीची क्षमता, परकीय चलन मिळवणे यासह इतर अनेक फायद्यांसाठी क्रूझ (Costa Serena Cruise) पर्यटनाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे. किनारी राज्य आणि बेटांच्या पर्यटन स्थळांवर जल पर्यटन स्थळे विकसित करणे यावर महत्त्वपूर्ण भर दिला जात आहे.

भारतातील क्रूझ (Costa Serena Cruise) पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा शुभारंभ शक्य झाला आहे. कोस्टा क्रूझ, इटली कार्निव्हल कॉर्पोरेशनचा एक भाग आहे, जो नामांकित क्रूझ ब्रँड्ससह जगातील सर्वात मोठ्या क्रूझिंग समूहांपैकी एक आहे. क्रूझ जहाजांना बर्थची हमी, सर्व प्रमुख बंदरांसाठी सवलतीचा एकसमान दर, देशांतर्गत क्रूझ जहाजांसाठी शुल्कामध्ये 30% पर्यंत सवलत, परदेशी क्रूझ जहाजांसाठी कॅबोटेज माफी , सीमाशुल्कसाठी एकसमान विशेष कार्यप्रणाली , इमिग्रेशन, सीआयएसएफ , बंदरे, प्रवासी सुविधा वाढवून क्रूझ टर्मिनल्सचे अद्यतनीकरण आणि आधुनिकीकरण इ. उपाययोजनांचा यात समावेश आहे.

(हेही वाचा – World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार)

अलीकडील सर्वात लक्षणीय पावलांपैकी एक म्हणजे परदेशात जाणाऱ्या परदेशी ध्वजवाहू जहाजाला जेव्हा ते किनारी भागात स्थानांतरीत होते तेव्हा या जहाजाला सशर्त आयजीएसटी सूट देण्यात आली असून याने परदेशी क्रूझ परिचालकांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. या उपक्रमांच्या परिणामी, 2013-14 मध्ये 102 क्रूझ शिप कॉल्स आणि 84,000 प्रवाशांना हाताळण्यात आले, 2022-23 मध्ये ही संख्या 227 कॉल्स आणि 4.72 लाख प्रवासी प्रवाशांवर पोहोचली. हे गेल्या 9 वर्षांतील (Costa Serena Cruise) क्रूझ कॉलमध्ये 223% आणि क्रूझमध्ये 461% वाढ दर्शवते. गेल्या 9 वर्षांमध्ये रिव्हर क्रूझ पर्यटनामध्ये 180% वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाजांची (Costa Serena Cruise) वाढती संख्या भारतीय समुद्रपर्यटन उद्योगात वाढत्या स्वारस्याचे द्योतक आहे. अनेक नवीन सेवा प्रस्तावित आहेत आणि या वाढत्या क्षेत्रासाठी उज्ज्वल भविष्याची हमी देत लवकरच त्या सुरू होतील.

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाची पथदर्शी योजना असलेल्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत (Costa Serena Cruise) क्रूझ पर्यटन आणि दीपगृह पर्यटनाच्या विकासाचा सक्रियपणे विचार केला जात आहे. सागरमाला अंतर्गत सागरी राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन मंत्रालय आणि सागरीकिनारा लाभलेल्या राज्य सरकारांच्या पर्यटन विकास विभागांच्या समन्वयाने प्रकल्प निवडले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.