iNCOVACC नेझल वॅक्सिनची किंमत ठरली; मोजावे लागणार इतके पैसे

114

चीनमधील वाढता कोरोनाचा उद्रेक बघता केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. या कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्रासह राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना बू्स्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी मिळाली आहे. यासह ही लस लवकरच बाजारात विक्रीसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर या लसीच्या किंमतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीची किंमत १ हजार रूपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत ८०० रूपये तर २०० रूपये जीएसटी, रूग्णालयाचे चार्ज असणार आहे.

दरम्यान, इंट्रानेजल वॅक्सिन iNCOVACC कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हिशिल्डचे (Covishield) लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून  परवानगी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इंट्रानेजल वॅक्सिन iNCOVACC या कोरोना लसीला बू्स्टर डोस म्हणून वापरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या वॅक्सिनची किंमत ८०० रूपये आणि जीएसटी ५ टक्के असणार आहे.

(हेही वाचा – आता नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध)

ही लस जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तर खासगी रूग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसला १५० रूपये दर आकारण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम जोडून कोरोना लसीची किंमत हजार रूपये होण्याची शक्यता आहे. नेझल कोरोना वॅक्सिन सेंट लुईस येथील वॉश्गिंटन विद्यापीठात विकसित करण्यात आली आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोरोना लसीचा पर्याय कोविन अॅपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार असून ही लस खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.