Congress vs SP : कॉंग्रेसच्या विरोधात सपाने दंड थोपटले; मध्यप्रदेशात दोन्ही पक्ष आमने-सामने

एकजुटतेचे पितळ उघडे पडले

128
Congress vs SP : कॉंग्रेसच्या विरोधात सपाने दंड थोपटले; मध्यप्रदेशात दोन्ही पक्ष आमने-सामने
Congress vs SP : कॉंग्रेसच्या विरोधात सपाने दंड थोपटले; मध्यप्रदेशात दोन्ही पक्ष आमने-सामने

देशातील 28 विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीची एकजुटता केवळ देखाव्यापुरतीच मर्यादीत आहे की काय? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाने मध्यप्रदेशात कॉंग्रेसच्या विरोधात नउ उमेदवार उतरविले आहेत. यामुळे सपा आणि कॉंग्रेसमध्ये आलबेल नाही, असे दिसून येत आहे.(Congress vs SP)

देशातील तमाम विरोधी पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्वपक्षांचा एकच उमेदवार उतरवायचा असा निर्णय घेतला आहे. परंतु, समाजवादी पक्षाला ही बाब अजिबात मान्य नाही असे दिसून येत आहे. याचे कारण असे की, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दंड थोपटले आहे. विशेष म्हणजे, हे उमेदवार दलित, अल्पसंख्यंक आणि यादव बहुल मतदारसंघात उतरविण्यात आले आहेत.

सपा इंडिया आघाडीतील यूपीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सपाकडून जादा जागांची अपेक्षा आहे. या बदल्यात सपाला कॉंग्रेसने काही जागा द्यावी अशी अपेक्षा अखिलेश यादव यांची होती.
परंतु कॉंग्रेसने एक जागा सुध्दा सोडली नाही.

काँग्रेसने रविवारी सकाळी एकूण 230 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 144  उमेदवार मध्यप्रदेशातील आहेत. कॉंग्रेसने ही यादी सकाळी 9 वाजता जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसने मित्र पक्षाचा धर्म पाळला नाही हे लक्षात येताच सपाने सायंकाळी 5 वाजता सपानेही नऊ उमेदवारांची घोषणा केली.(Congress vs SP)

(हेही वाचा-DRI : सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ जणांना अटक तर…)

पाच जागांवर काँग्रेस आणि सपाचे उमेदवार आमनेसामने आहेत. सपाने जाहीर केलेल्या अन्य चार जागांवर काँग्रेसने अद्याप उमेदवार उभे केलेले नाहीत. या जागांवर काँग्रेसच्या दोन ते तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

या उमेदवारांची नावे पुढील यादीत निश्चित केली जाणार आहेत. इंडिया  आघाडीबाबत चर्चा सुरू असली तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सपाला जागा देण्याच्या मनस्थितीत नाही. सपाने जारी केलेल्या नऊ उमेदवारांच्या यादीत पाच ओबीसी, तीन यादव, तीन दलित आणि एक ब्राह्मण उमेदवार आहेत. दोन्ही पक्षात आघाडी न झाल्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.

सपाने निवारीच्या माजी आमदार मीरा दीपक यादव, राजनगरमधून ब्रिजगोपाल पटेल उर्फ बबलू पटेल, भांडेर राखीव जागेवरून निवृत्त जिल्हा न्यायाधीश डीआर राहुल (अहिरवार), धौहनी राखीव जागेवरून विश्वनाथ सिंग मरकाम, चित्रांगी राखीव जागेवरून श्रवण यांचा समावेश आहे. गोंडमधून कुमार सिंह रिंगणात असतील.

याशिवाय सिरमौरमधून लक्ष्मण तिवारी, बिजावरमधून डॉ. मनोज यादव, कटंगीमधून महेश सहारे आणि सिधीमधून रामप्रताप सिंह यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार घोषित करण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशच्या पक्षाच्या मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती.

दरम्यान, सपा आणि कॉंग्रेस ज्या जागांवर आपसात भिडणार आहेत त्यात भंडार, राजनगर, बिजावर, चित्रांगी आणि कटंगी या मतदारसंघाचा समावेश आहे. समाजवादी पक्ष कॉंग्रेसवर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.