छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रायगडावर लाखो मावळ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो, या सोहळ्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली चांदीची मोठी पालखी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्रीय स्मारकात विराजमान आहे.
(हेही वाचा Congress नेते रत्नाकर महाजनांकडून मृतांचा अपमान; म्हणाले, Pahalgam हल्ल्यात मृत झालेल्या २६ पैकी १४ मुस्लिम!)
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रायगडावर महाराजांची वाजत गाजत पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. त्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी चांदीची पालखी भेट म्हणून शिवराज्याभिषेक समितीला दिली. ही पालखी खूप मोठी असल्यामुळे ती योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे ती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि समितीच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी ही पालखी सावरकर स्मारकात ठेवावी, असे समितीला सांगितले. त्यासाठी स्मारकातर्फे सुंदर टेबल पालखी ठेवण्यासाठी देण्यात आले. याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे शिवराज्याभिषेक समितीतर्फे सर्व मावळे यांनी आभार मानले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
Join Our WhatsApp Community