Chandrayaan 3 : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अद्याप स्लीप मोडवर; शनिवारी इस्रो करणार रिलाँन्च

122

सध्या Chandrayaan 3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर अंधार असल्याने मागील १५ दिवस निष्क्रिय होता, आता चंद्रावर पुन्हा प्रकाश पडत आहे. त्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा चार्ज होत आहे आणि त्यांना रिलाँन्च करण्याचा प्रयत्न होत आहे. २२ सप्टेंबर रोजी इस्रोने लँडर आणि रोव्हर यांना सुरु करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही, आता इस्रो हा प्रयत्न शनिवार, २३ सप्टेंबर रोजी करणार आहे.

हे पहा –

चंद्रावर आता सकाळ झाली आहे. तिथे आता प्रकाशही पूर्णपणे मिळत आहे. पण Chandrayaan 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला अद्यापही गरज हवी तितकी ऊर्जा मिळत नाही. Chandrayaan 3  मुळे अनेक नवी माहिती हाती लागली आहे. वैज्ञानिक या सर्व माहितीचा अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांतील सर्व डेटा पडताळला जात आहे. यादरम्यान प्रज्ञान रोव्हरने 150 मीटरपर्यंत हालचाल केली आहे. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरुन वेगवेगळी माहिती पाठवल्यानंतर Chandrayaan 3 स्लीप मोडवर गेले होते. त्यावेळी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 120 ते 220 डिग्री सेल्सिअस होते. यामुळे यंत्रांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते.
या तापमानाचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर किती परिणाम झाला याची माहिती Chandrayaan 3 पुन्हा जागे झाल्यानंतरच समजू शकणार आहे. याआधी आज अलसुबह यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) च्या कोरोऊ स्पेस स्टेशनमधून  Chandrayaan 3 च्या लँडर विक्रमला सतत मेसेज पाठवले जात होते. पण लँडरकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आहे. म्हणजेच अद्यापही रेडिओ फ्रिक्वेन्सी हवी तितकी मजबूत नाही. Chandrayaan 3 सतत ऑन-ऑफ सिग्नल पाठवत आहे. चंद्रावरून येणारे सिग्नल कधीकधी स्थिर असतात. कधी उड्या मारतात, तर कधी पूर्णपणे खाली पडणे. तर कोराऊ येथून पाठवलेला सिग्नल स्थिर आहे. सध्या, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्रो या दोघांनीही Chandrayaan 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले आहेत की नाही याची पुष्टी केलेली नाही. दुपारपर्यंत इस्रो याची पुष्टी करेल, असे मानले जात आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम लँडर असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.