पावसात रेल्वेचा खोळंबा झाल्यास मिनिटात येईल अपडेट; रेल्वे प्रवाशांसाठी नवे अ‍ॅप!

109

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता ‘यात्री’ मोबाइल या अ‍ॅप्लिकेशनवर मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळणार आहे. १३ जुलै २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत यात्री ॲपच्या या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले.

यात्री अ‍ॅप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांना रेल्वे विषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. मेगाब्लॉकमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होणे, ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना यात्री या अ‍ॅपद्वारे मिळेल असे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’)

लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग हे या अ‍ॅपचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ”यात्री” हे एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे जे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यास देखील मदत करेल. याद्वारे लोकल ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन कळण्यास मदत होऊन आपण नकाशावर ट्रेनचे स्थान पाहू शकतो. यात डेटा दर १५ सेकंदांनी ऑटो रिफ्रेश होतो आणि ट्रेनचे अपडेट केलेले लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी वापरकर्ते रिफ्रेश बटणावर क्लिक करू शकतात. वापरकर्त्याला ट्रेनच्या आगमनासंदर्भात वेळेवर सूचना देखील मिळतील. ही सुविधा मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर लाईनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

यात्री अ‍ॅपची इतर वैशिष्ट्ये

1. थेट अपडेट मिळणार
2. लोकल ट्रेन्सचे अपडेट केलेले वेळापत्रक
3. उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील
4. स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन
5. मेल एक्सप्रेस ट्रेनची माहिती जसे की “स्पॉट तुमची ट्रेन” आणि “पीएनआर स्थिती”
6. मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानकनिहाय सुविधा पाहणे
7. रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक
8. आवडत्या (नियमित) गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे
9. एका टॅपमध्ये SOS साठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे
10. मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.