Cafe Comedy’ Stand Up Show : ‘अल्ट्रा झकास’च्या ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शोला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

कॅफे कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांचं खास मनोरंजन करतो आहेच पण त्याचबरोबर शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नव्या कलाकारांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होत आहे.

182
Cafe Comedy' Stand Up Show : ‘अल्ट्रा झकास’च्या ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शोला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या विविध मराठी बोलीतील विविध गोष्टी आपल्या विनोदी ढंगाने सादर करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची फौज ‘कॅफे कॉमेडी’ (Cafe Comedy’ Stand Up Show) या ‘अल्ट्रा झकास’च्या स्टँड अप शोमध्ये दाखल झाली आहे. ‘कॅफे कॉमेडी’ हा ओटीटी माध्यमावर येणारा पहिला स्टँड अप शो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचून रसिक प्रेक्षकांचं मन दिवसेंदिवस जिंकून घेत आहे.

(हेही वाचा – Ujjwal Nikam: दाऊदच्या विषप्रयोगामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे, उज्ज्वल निकम यांचा टोला)

अभिनेत्री काजल केशव सूत्रसंचालक  

‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शो (Cafe Comedy’ Stand Up Show) आशिष पाथरे यांनी निर्मित केले असून अमोल जाधव हे दिग्दर्शन करत आहेत. शोमध्ये संदीप गायकवाड, मंदार मांडवकर, आकांक्षा अशोक, किमया मयेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी, सचिन सकपाळ आणि रामदास टेकाळे हे कलाकार आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहेत. या कलाकारांसोबतच आणखी तगडे कलाकार शोमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार आहेत. तसेच मराठमोळी अभिनेत्री काजल केशव आपल्या खास सूत्रसंचालनाने या शोची खास आकर्षण बनली आहे.

(हेही वाचा – Joe Biden Security Lapse : राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्याला एका अज्ञात कारची धडक)

नव्या कलाकारांना संधी 

“कॅफे कॉमेडी’ हा शो (Cafe Comedy’ Stand Up Show) प्रेक्षकांचं खास मनोरंजन करतो आहेच पण त्याचबरोबर शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नव्या कलाकारांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.