मुंबईतील मलतुंबई : १५ ते २० वर्षांत झाली नाही मलवाहिन्यांची सफाई

122

मुंबईत निर्माण होणारे मल हे वाहिन्यांमधून वाहून नेण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या असल्या तरी शहर भागातील मलवाहिन्या या ५० ते ६० टक्के गाळाने भरलेल्या आहेत. या मलवाहिन्यांची मागील मागील १५ ते २० वर्षांमध्ये सफाईच झाली नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्यावतीने मलवाहिन्यांची योग्यप्रकारे सफाई राखण्याचे काम न झाल्यानेच मागील काही वर्षांपासून मुंबईतील अनेक रस्त्यांवर मलतुंबई होत दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

( हेही वाचा : बूस्टरसाठी व्हा सज्ज! कोणती लस घेणार, नोंदणी कशी कराल, प्रमाणपत्र मिळणार का? )

मलवाहिन्यांमधील गाळाची सफाई करण्याचा निर्णय

मुंबई शहरामध्ये ब्रिटीशकालिश रस्त्याखालून भूमिगत मलनि:सारण वाहिनी असून एकूण २०२६ कि.मी एवढ्या लांबीच्या या मलवाहिन्यांचे जाळे कुलाबा ते माहिम, धारावी, शीव आदी भागांमध्ये पसरलेले आहे. शहर भागातील मनुष्य प्रवेश शक्य असलेल्या काही मलवाहिन्यांपैंकी मोहम्म अली रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, खेतवाडी रोड, मौलाना शौकत अली रोडवरील मलवाहिन्यांमध्ये ५० ते ६० टक्क्यांपर्यंत गाळ साचल्याने त्या वाहिन्या तुंबलेल्या स्थितीत असल्याची माहिती खुद्द महापालिका मलनि:सार विभागाने दिली आहे.

बंदिस्त नाल्यांची सफाई ही पॉवर बकेट यंत्रसामुग्रीद्वारे जीआरपी लाईनिंगद्वारे केली जाते. परंतु या मलवाहिन्यांची साफसफाई याद्वारे करता येणे शक्य नसल्याने तसेच मनुष्य प्रवेश करून मलवाहिन्यांच्या साफसफाईवर असलेली बंदी यामुळे मनुष्य प्रवेश शक्य असलेल्या मलवाहिन्यांची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे मलवाहिन्यांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये जास्त प्रमाणात गाळ जमा झाला आहे. त्यामुळे आता शहर भागातील आठ प्रमुख रस्त्यांवरील मलवाहिन्यांमधील गाळाची सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून यामध्ये सुमारे पावणे नऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी मेसर्स आयचीन क्लिनींग सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मलनि:सारण प्रचालन खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीमध्ये रिसायकलिंगची सुविधेसह सक्शन कम जेटींग मशीन्स समाविष्ट आहेत. या रिसायलिंग सक्शन कम जेटींग मशीन्सद्वारे ६०० मि.मी व्सासाच्या मलवाहिन्यांची साफसफाई केली जाते. सध्या उपलब्ध असलेल्या मशीनद्वारे साफसफाई करण्याची पध्दती ही ६०० मि.मी पेक्षा जास्त व्यासाच्या तसेच जास्त गाळ साचलेल्या मलवाहिन्यांच्या साफसफाईकरता उपयोगी येत नाही,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यामुळे तुंबतात मलवाहिन्या

ज्या मलवाहिन्यांची बऱ्याच वर्षांमध्ये साफसफाई झालेली नाही अशा मलवाहिन्यांमध्ये कालांतराने साचलेल्या गाळाचे प्रमाण हे जास्त आणि घट्ट असते. तसेच या गाळामध्ये प्लास्टिक, कपडे, चिंध्या, झाडांच्या फांद्या इत्यादी वस्तू घट्ट प्रमाणात गुंतून असण्याची दाट शक्यता असते,असे अनुभव अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • मोहम्मद अली रोड (मलवाहिन्यांची लांबी मीटरमध्ये :१०७०)
  • मोहम्मद अली रोड (मलवाहिन्यांची लांबी मीटरमध्ये :१००)
  • सरदार वल्लभभाई पटेल रोड (मलवाहिन्यांची लांबी मीटरमध्ये :६१०)
  • त्र्यंबक परशुराम मार्ग (मलवाहिन्यांची लांबी मीटरमध्ये :४००)
  • खेतवाडी बॅक रोड (मलवाहिन्यांची लांबी मीटरमध्ये :३९०)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.