Bhaubeej 2023 : जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणत्या नावाने साजरी केली जाते भाऊबीज

133
Bhaubeej 2023 : जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणत्या नावाने साजरी केली जाते भाऊबीज

भाऊबीज (Bhaubeej 2023) हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.

पण तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र सोडून इतर राज्यातही भाऊबीज (Bhaubeej 2023) साजरी केली जाते. मात्र या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी भाऊबीज साजरी केली जाते.

महाराष्ट्रातील भाऊबीज

महाराष्ट्र आणि गोव्यात भाऊबीज (Bhaubeej 2023) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी बहिण भावाला औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते.

(हेही वाचा – Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी)

पश्चिम बंगालमधील ‘भाई फोटा’

भाऊबीज (Bhaubeej 2023) हा सण पश्चिम बंगालमध्ये ‘भाई फोटा’ उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहिणी उपवास ठेवतात आणि भावाचे औक्षण करुनच भोजन करतात. औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

Untitled design 39

उत्तर प्रदेशातील ‘भाई दूज’ उत्सव

उत्तर प्रदेशात भाऊबीज (Bhaubeej 2023) ही ‘भाई दूज’च्या नावाने ओळखली जाते. यानिमित्ताने बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन साखरेचे बत्तासे खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात भाऊबीजेला सुके खोबरे देण्याची परंपरा आहे.

बिहारमध्ये बहीण पहिले भावाला श्राप देते आणि मग…

भाऊबीजेच्या (Bhaubeej 2023) दिवशी बिहारमध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी बहिणी भावांना फटकारतात आणि त्यांना चांगले-वाईट बोलतात, त्यांना खोटा खोटा श्राप देतात आणि नंतर त्यांची माफी मागतात. येथील नागरिक सांगतात, ही परंपरा भाऊंनी भूतकाळात केलेल्या चुकांमुळे पाळली जाते. या नंतर बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन मिठाई खाऊ घालतात.

(हेही वाचा – Pollution : प्रदूषणाचे गांभीर्य केवळ सण उत्सवापुरतेच नको!)

नेपाळमध्ये ‘भाई तिहार’

भाऊबीज नेपाळमध्ये ‘भाई तिहार’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिहार म्हणजे कपाळी लावला जाणारा कुंकवाचा टिळा. याशिवाय येथे (Bhaubeej 2023) भाऊबीज ‘भाई टिका’ नावाने साजरा केला जातो. नेपाळमध्ये या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर सात रंगांचा टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

Untitled design 40 1

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.