बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि दहावीनंतर बारावीपर्यंत मुलांना सवलतीचा बसपास दिला जातो. या सवलतीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी नाहीत त्यांनाही हा पास देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना गुरूवारी दिले. तसेच बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची थकित देणीही गणेशोत्सवाआधी ताबडतोब देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बेस्ट उपक्रमाच्या अमृतमहोत्वानिमित्त इलेक्ट्रिक दुमजली एसी बस आणि प्रिमियम बसचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील एनसीपीए येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
( हेही वाचा : मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! देशातील पहिल्या एसी Double Decker बसचे लोकार्पण)
बेस्टची प्रिमियम बस कशी असणार
बेस्ट प्रिमियम बस सप्टेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रिमियम बसमध्ये प्रवाशांना आसन मोबाईल अॅपद्वारे आगाऊ आरक्षित करता येणार आहे. या बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास बंदी असणार आहे. या सेवेत मासिक पासही उपलब्ध केला जाईल, याचे भाडे स्थिर असेल. या सेवेसाठी ४५ आसनी १०० बसगाड्या टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. प्रवासाआधी तुम्हाला यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागेल त्यासाठी मोबाईन अॅप उपलब्ध करण्यात येईल.
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
Join Our WhatsApp Community