बेस्ट कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी घाटकोपर, आणिक आगाराला भेट दिली. १ जुलैपासून सुरू होणारे चौमाही कामवाटप, ड्युटी शेड्युल कामगारांसाठी जाचक तसेच अन्यायकारक आहे अशी कामगारांची तक्रार होती. यामुळे गणाचार्यांनी घाटकोपर, आणिक आगार अधिकाऱ्यांशी चौमाही कामवाटप, ड्युटी शेड्युल याबद्दल विचारणा केली. तसेच बेस्टच्या जनरल मॅनेजरांना अन्यायकारक ड्युटी शेड्युलमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली.
कामगारांना कोणताही त्रास न देता काम करावे
कर्मचाऱ्यांची पहिली कमी तासांची व दुसरी पाळी जास्त तासांची करण्यात आली. तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवण्यात आल्या यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. यामुळे भाजपचे ज्येष्ठ बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्यांनी संबंधित आगाराला भेट देऊन कामगारांचे सर्व समस्या समजून घेऊन त्याबद्दल आगार व्यवस्थापक खिस्ते यांच्याशी चर्चा केली आणि कामगारांना कोणताही त्रास न देता काम करावे असे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी घाटकोपर आगार व इतर आगाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. याआधीही सुनील गणाचार्यांनी ओशिवरा आगाराला भेट देऊन कामगारांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करत आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या होत्या.