बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी कामगारांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ओशिवरा आगाराला भेट दिली. आगाराला भेट दिल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांना खालील सूचना केल्या…
( हेही वाचा : राज्यसभेसाठी शिवसेनेची ‘मावळ्या’ला पसंती! ‘राजें’बाबत सस्पेन्स कायम )
1) ओशिवरा आगार, सात बंगला बस स्थानक, वर्सोवा बस स्थानक, तसेच अंधेरी बस स्थानक येथील अस्वच्छ शौचालय तसेच नीटनेटके करण्याबाबत आगार व्यवस्थापकांना निर्देश देण्यात आले.
2) ओशिवरा आगारातील बंद असलेली कॅन्टीन व्यवस्था लवकरात लवकर चालू करण्यासाठी तरतूद करावी तसेच सात बंगला बस स्थानक व वेसावे बस स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुधारण्याबाबत निर्देश देण्यात आले.
3) अंधेरी येथील रोख व तिकीट विभाग येथील ७ ही वेळ वाढवून ७.३० करण्यात आलेली आहे.
4) प्रत्येक महिन्यात रकमेच्या स्वरूपात प्रधान करण्यात येणारे वेतन हे ओशिवारा आगार येथे पाच वाजेपर्यंत प्रदान करण्यात येईल.
5)रजा पास करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
6) तिकीट व रोख विभाग येथील आसन व्यवस्था सुधारण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
7) कामगारांच्या खात्यातील रजांबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती रविंद्र गणाचार्य, समर्थ बेस्ट कामगार संघटने चे जेष्ठ उपाध्यक्ष बाबू भोसले,ओशिवरा आगारचे विभागीय सचिव संजय भोज, आगार सचिव युनियन प्रतिनिधी उमेश गायकवाड, राजू शिंदे, उप सचिव राहुल वैती, मुणगेकर, वाळकेसाहेब, कुचेकर, मेस्त्री. सांताक्रूझ आगारचे सुभाष कांबळे,कुंभार आदी सर्व पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.