बेस्ट वातानुकूलित बसला भीषण आग, पहा व्हिडिओ…

108

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अलिकडे मोठ्या प्रमाणात एसी बस दाखल होत आहेत. बेस्टच्या गोराई आगारात एसी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

( हेही वाचा : एसटी कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा; ८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम रखडली)

या घटनेबाबत चौकशी केली असता शॉट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. बसला आगारातंच आग लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेस्ट बसला आग पहा व्हिडिओ

यापूर्वीही एसी बसने घेतला होता पेट 

दरम्यान अलिकडेच कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगर येथून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला सुद्धा शॉट सर्किटमुळे आग लागली होती. या बसमध्ये प्रवासी सुद्धा उपस्थित होते. या बसने सुद्धा अचानक पेट घेतला, बस चालकाच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती. त्यानंतर गोराई आगारात उभ्या असलेल्या बसला अशाचप्रकारे आग लागल्याने आता प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.