बेस्टच्या एसी बसेस आणिक आगारात धूळखात

125

बेस्ट बसला मुंबईकरांची लाईफलाईन समजले जाते. ही लाईफलाईन ज्या बेस्ट प्रशासनाच्या अखत्यारित येते त्या बेस्टकडे जर सक्षम अधिकारी नसतील तर दुसरे नेमावेत असे ट्वीट ट्रॅव्हलर चेतन जगताप यांनी हिंदुस्थान पोस्टला टॅग करत केले आहे.

( हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गर्दीचा दावा ठरला फोल; मोर्चात केवळ ६०-६५ हजार लोकांचा सहभाग)

५० ते ६० बसेस पडून…

बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांसाठी एसी बसेस सुरु केल्या आहेत मात्र जवळपास ५० ते ६० बसेस आता आणिक आगारात धूळ खात पडल्याचा फोटो या युजरने ट्वीट केला आहे. बेस्ट प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे जर या बसेस पुन्हा वापरात येणार नसतील तर एसटी महामंडळाला या बस देऊन टाका, जेणेकरून गावाकडच्या भागात याचा उपयोग होईल किंवा बीकेसीसारख्या भागात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशा महत्त्वाच्या ठिकाणी या बसेसमार्फत सेवा पुरवली जावे असेही त्यांनी नमूद केले आहे.

एमपी असोसिएशनने १५० एसी बसेस बेस्टला दोन वर्षांपूर्वी दिल्या होत्या त्यानंतर बेस्टने एमपीसोबतचे कंत्राट बेस्टने रद्द केले. मात्र, या बसेस आपल्याकडेच ठेवल्या कुलाबा आणि आणिक आगारामध्ये या बस असून यासाठी प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.