Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये दहशतवादी वाहिनीच्या प्रसारणावर बंदी, पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आदेश

नेतान्याहू यांनी 'अल जझीरा' वाहिनी बंद करण्याबाबत इस्रायली सुरक्षेला हानी पोहोचवणे, ७ ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यात सहभागी होणे आणि इस्रायलविरुद्ध हिंसाचाराला आव्हान देणे; ही कारणे सांगितली आहेत.

100
Israel-Hamas War: हमासच्या अंताची उलट मोजणी सुरू, बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली नव्या हल्ल्याची घोषणा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू (Benjamin Netanyahu) यांनी देशातील अल जझीरा वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. संसदेत सोमवारी एक कायदा पारित झाल्यानंतर नेत्यनाहू यांनी ही ‘दहशतवादी वाहिनी’ बंद करण्याचे आदेश दिले. कायदा पारित झाल्यानंतर इस्रायलमध्ये अल जझीराचे प्रसारण थांबवण्याचा मार्ग सरकारसाठी स्पष्ट झाला.

नेतान्याहू यांनी ‘अल जझीरा’ वाहिनी बंद करण्याबाबत इस्रायली सुरक्षेला हानी पोहोचवणे, ७ ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यात सहभागी होणे आणि इस्रायलविरुद्ध हिंसाचाराला आव्हान देणे; ही कारणे सांगितली आहेत. या वाहिनीचे प्रसारण बंद करण्याविषयी त्यांनी समाजमाध्यम ‘X’वर पोस्ट लिहिली आहे. ‘अल जझीरा’ ही दहशतवादी वाहिनी यापुढे इस्रायलमध्ये प्रसारित केली जाणार नाही तसेच वाहिनीचे उपक्रम थांबवण्यासाठी नवीन कायद्यांतर्गत त्वरित कारवाई करण्याचा माझा संकल्प आहे, असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून महायुती आणि आघाडीत वाद कायम…..!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.