शब्दांचे जादूगर म्हणून नावाजलेले बंगाली साहित्यिक Satyendranath Dutta

149
सत्येंद्रनाथ दत्ता (Satyendranath Dutta) हे बंगाली कवी होते. त्याचबरोबर मध्ययुगीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पौराणिक कथा असा अनेक विषयांचे तज्ञ होते. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८८२ रोजी बंगालमध्ये झाला आणि वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी १९२२ मध्ये त्यांचे निधन झाले. १९०३ मध्ये सत्येंद्रनाथ दत्त यांनी ईशान चंद्र बोस आणि गिरीबाला देव यांची मोठी मुलगी कनकलता देवी यांच्याशी विवाह केला.
सत्येंद्रनाथ दत्ता (Satyendranath Dutta) यांच्या वडिलांचे नाव रजनीनाथ दत्ता. ते व्यापारी होते. त्यांचे आजोबा, अक्षय कुमार दत्ता, एक महान विचारवंत, ब्राह्मो समाजसुधारक आणि लेखक होते व तत्वबोधिनी पत्रिकेचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते. सेंट्रल कॉलेजिएट स्कूलमधून परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकाता येथील जनरल असेंब्लीच्या संस्थेतून पदवी-स्तरीय शिक्षण घेतले. मात्र पदवी न घेताच त्यांनी कॉलेज सोडले.

कविता रचताना शब्दांची कमतरता कधीच भासली नाही

इच्छा नसतानाही आपल्या वडिलांच्या कौटुंबिक व्यवसायात त्यांनी पदार्पण केले. मात्र कवी मनाच्या दत्ता यांना व्यवसाय जमला नाही. मग त्यांनी व्यवसायाला देखील रामराम म्हटले आणि आपल्या प्रतिभेला शोभेल अशा बौद्धिक व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. सबिता, संधिक्षण, बेनू ओ बिना, कुहू ओ केका, तुलिर खिलोन अशी अनेक काव्यसंग्रह त्यांनी निर्माण केली. त्यांना “शब्दांचे जादूगार” म्हटले जायचे. त्यांचा भाषेवर आणि काव्यावर इतके प्रभुत्व होते की, त्यांनी विविध प्रकारच्या आणि विविध शैलीतल्या कविता रचल्या. त्याचबरोबर कविता रचताना त्यांना शब्दांची कमतरता कधीच भासली नाही. उलट शब्दच त्यांच्या भोवती घिरट्या घालायचे. म्हणूनच त्यांना शब्दांचे जादूगर म्हटले जायचे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.