वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देणार; २८ मे रोजी होणार घोषणा

249
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देणार; २८ मे रोजी होणार घोषणा
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देणार; २८ मे रोजी होणार घोषणा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यासंदर्भात आग्रही आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबईतील तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना महापुरुषांची नावे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. फडणवीसांच्या मागणीनुसार, दुसऱ्या टप्प्यात वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव दिले जाईल. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत घोषणा करतील, असे सांगण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

फडणवीसांच्या पत्रात काय? 

राज्यात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे होत आहेत आणि त्याला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ही विकास कामे जशी जनसुविधा म्हणून सातत्याने ओळखली जातील, तशीच त्या प्रत्येक कामाच्या निमित्ताने आपल्या महापुरुषांच्या आणि महनीयांच्या आदर्शाचे सुद्धा स्मरण येणाऱ्या पिठ्यांना झाले पाहिजे, ही बाब सुद्धा तितकीच आवश्यक आहे आणि तीच या मागण्यांमागची भूमिका आहे.
म्हणून मी खालीलप्रमाणे मागण्या आपल्याकडे करतो. १) मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. २) वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात पावे. ३) मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अजेय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे. महापुरुष, महनीयांच्या कार्याची येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा मिळत रहावी, या हेतूने आपण या मागण्यांवर सत्वर निर्णय घ्याल, ही विनंती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.