महापालिका निवडणूक भाजप मिशन: महापालिका १३४, भाजप १३४ प्लस

97

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेनेने मिशन १५० ठेवले असतानाच भाजपने याचा जोरदार समाचार घेतला आहे. मागील २५ वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधीही बहुमतात निवडून आलेली नाही. प्रत्येक वेळी भाजपच्या समर्थनामुळेच शिवसेनेचा मुंबईत आवाज मोठा झाला आहे. त्यामुळे आज पराभूत मानसिकेतून नगरसेवकांचे वॉर्ड फोडत असतील नाहीतर जिल्हा नियोजन समितीचा निधी नगरसेवकांना वाटत असले तरी मुंबई महापालिकेला १३४ वर्षे झाल्याने भाजपही १३४ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणेल असा विश्वास भाजपचे महापालिका प्रभारी आमदार ऍड आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – प्रशासकाच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवणार भाजपचे २३६ पहारेकरी!)

आमच्या समर्थनाशिवाय सेनेला सत्ता मिळालेली नाही

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आशिष शेलार यांनी महापालिका १३४ आणि भाजप १३४ अधिक असे मिशन जाहीर केले. मागील १२५ वर्षांत शिवसेनेला कधीही मेजोरिटी नाही. आमच्या समर्थनाशिवाय त्यांना सत्ता मिळालेली नाही. एकदा त्यांना १०३ नगरसेवक निवडून आले होते, त्यानंतर त्यांना सरासरी ७३ पर्यंत नगरसेवक निवडून आलेले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना आवाज मोठा करायला दिला. म्हणून त्यांनी आवाज उघडला आहे. शिवसेना म्हणते आम्ही युतीत सडलो, खरे तर आम्ही युतीत सडलो असे म्हणायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

युतीतील भ्रष्टाचाराला शिवसेनाच जबाबदार

महापालिकेतील शिवसेनेच्या २५ वर्षांतील काही वर्षे आम्ही सोबत होतो हे सत्य आहे. पण कधीही स्थायी समिती आमच्याकडे नव्हती. आर्थिक निर्णयात आम्ही नव्हतो, ठेकेदारी आम्ही ठरवत नव्हतो, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे नव्हत्या. आम्हाला कधीच निर्णय करण्याची क्षमता दिलीच नाही अणि आम्ही कधीच ती वापरली नाही,असे ही शेलार यांनी स्षष्ट करत युतीतील भ्रष्टाचाराला शिवसेनाच जबाबदार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे युतीत असताना आम्ही आक्षेप घेतला म्हणून महात्मा ज्योतीबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केट ही हेरिटेज वास्तू वाचली, नालेसफाईचा भ्रष्टाचार युतीत असताना आम्ही काढला, संगणीकरणातील सॅप घोटाळा आम्हीच बाहेर काढला, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तुरटी आणि ऍलमचा घोटाळा आम्ही काढला,असे सांगत अशाप्रकारे अशाप्रकारे मी २५ प्रकरणे देऊ शकेन,असेही शेलार यांनी सांगितले.

शेलारांनी सेनेला करून दिली त्यांच्या अस्तित्वाची आठवण

आम्ही युतीत असताना, त्यावेळी जनतेची लढाई लढलो.आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रकरणावर त्यांनी उत्तर दिले नाही. प्रश्न विचारले तरी आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवले जाते, मराठी द्रोही ठरवले जाते. परंतु त्यांचा जन्म होण्यापूर्वी आम्ही मुंबईत आहोत असे सांगत शिवसेनेला त्यांच्या अस्तित्वाची अप्रत्यक्ष आठवणही शेलार यांनी करून दिली. प्रभाग रचनना ही त्यांच्या परभूत मानसिकतेतून आली आहे., २३६ प्रभाग झाले पण त्यापैकी ९६ प्रभाग हे विद्यमान नगरसेवकांचे होते जे तसेच तसे आहेत, १४० वॉर्ड फोडलेले किंवा जोडलेले आहेत, नव्याने निर्माण केले आहे. पण या ९६पैकी ५३ प्रभाग हे शिवसेनेच्या नगरसेवकांचे आहेत. स्वत:च्या नगरसेवकांचे वॉर्ड चांगल ठेवले आणि भाजपचे ५२ वॉर्ड फोडले, यातच त्यांची मानसिकता उघड होत आहे. याचा जन्म हा पराभूत मानसिकेतच्या झाला आहे हे उघड होतो, असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.