Alexander Graham Bell : हॅलो, मी ग्रॅहॅम बेल बोलतोय! पहिला टेलिफोन निर्माण करणारे शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

ग्रॅहॅम बेल यांचा जन्म एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे ३ मार्च १८४७ रोजी झाला.

176
Alexander Graham Bell : हॅलो, मी ग्रॅहॅम बेल बोलतोय! पहिला टेलिफोन निर्माण करणारे शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
Alexander Graham Bell : हॅलो, मी ग्रॅहॅम बेल बोलतोय! पहिला टेलिफोन निर्माण करणारे शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) हे नाव अगदी लहानपणीच आपल्याला शालेय पुस्तकातून ओळखीचं होतं. ग्रॅहॅम बेल इतके विलक्षण प्रतिभासंपन्न होते की त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पदवी संपादन केली होती. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते एक उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले ही देखील आश्चर्याची बाब आहे.

ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांचा जन्म एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे ३ मार्च १८४७ रोजी झाला. ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांची आई बहिरी होती. या घटनेने ते सुरुवातील खूप निराश झाले होते. पण त्यांनी काम करण थांबवलं नाही. आपल्या निराशेचे रुपांतर त्यांनी सकारात्मकतेमध्ये केले. त्यामुळेच श्रवणदोष असलेल्या लोकांसाठी असे उपकरण बनवण्यात त्यांना यश आले, जे आजही कर्णबधिरांसाठी वरदान ठरत आहे.

(हेही वाचा – Jamsetji Tata : टाटा समूहाचे संस्थापक महान उद्योजक जमशेदजी टाटा)

ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांना लहानपणापासूनच ध्वनीशास्त्राची आवड होती, म्हणूनच वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी एक पियानो बनवला ज्याचा मधुर आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात असे. काही काळ त्यां भाषण तंत्रज्ञान विषयाचे शिक्षक म्हणूनही काम गेले. या काळातही त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि एक असे वाद्य तयार करण्यात यश मिळविले जे केवळ संगीताच्या नोट्स पाठविण्यास सक्षम नव्हते तर आर्टुक्ल्युलेट स्पीच देखील देऊ शकत होते. विशेष म्हणजे हे टेलिफोनचे सर्वात जुने मॉडेल होते.

ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांनी केवळ टेलिफोनच नव्हे तर दळणवळण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतर अनेक उपयुक्त शोध लावले आहेत. ऑप्टिकल-फायबर प्रणाली, फोटोफोन, बेल आणि डेसिबल युनिट, मेटल-डिटेक्टर इत्यादींच्या शोधाचे श्रेयही त्यांना जाते. त्यामुळे ग्रॅहॅम बेल यांनी विज्ञानाच्या सहाय्याने मावनी जीवन सुकर केले आहे. या महान शास्त्रज्ञानाला मानवंदना.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.