गोदाकाठी साहित्याचं महाकुंभ! आजपासून 94 व्या मराठी साहित्य संमेलनाचा ‘श्रीगणेशा’

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान

75

नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार पासून सुरु झाले आहे. नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होत आहे.तर साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. लेझीमचा ताल आणि ढोल ताशांच्या गजरात नाशिकनगरी दुमदुमली. दोन वर्षांनी नाशिकमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळा पाहायला मिळाला आहे. नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर यांनी रामकृष्ण हरीचा गजर करत ठेका धरला.

sahitya 1

संमेलनाला अध्यक्षच उपस्थित नाहीत

नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

sahitya 2

पडला होता सावरकरांचा विसर

नाशिक येथे मराठी साहित्य संमेलन वीर सावरकरांच्या कर्मभूमीत अर्थातच नाशिक येथे होणार आहे, त्याच व्यक्तीचा संमेलनाच्या आयोजकांना विसर पडला होता. साहित्य संमेलनाच्या गीतात वीर सावरकरांचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेमींमध्ये नाराजीचा सूर होता. याकरता भगूरमध्ये त्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे, राज्यभरातून निषेध पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू करण्याची योजनाही तयार करण्यात येत होती. पण, त्याआधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी गाण्यात ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असा उल्लेख करत त्यांचा फोटोही गाण्यासोबत समाविष्ट केला.

 (हेही वाचा: प्रदूषणाला अटकाव! आता दिल्लीत धावणार ग्रीन हायड्रोजनवरील वाहनं )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.