Prashant Damle : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड 

अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले यांचं 'रंगकर्मी समूह' या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.

166

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अखेर मंगळवार, १६ मे रोजी लागला. या परिषदेचे अध्यक्षपद नक्की कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. त्यांना ६० पैकी ५० मते मिळाली.

अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. या संपूर्ण निवडणुकीत ‘रंगकर्मी नाटक समूहा’चा दबदबा दिसला. ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांच्या कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.

नाट्य परिषद पुढील ५ वर्षे उत्तम काम करेल. परिषदेच्या राज्यभरातील शाखांचाही विकास केला जाईल. नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करण्यात येईल.
– प्रशांत दामले, ज्येष्ठ रंगकर्मी. 

विजयी उमेदवार 

  • अध्यक्ष- प्रशांत दामले
  • सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
  • कार्यवाह – अजित भुरे
  • कोषाध्यक्ष – सतिश लोटके
  • उपाध्यक्ष – नरेश गडेकर
  • उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
  • खजिनदार- सतीश लोटके

पराभूत उमेदवार 

  • प्रसाद कांबळी
  • सुकन्या कुलकर्णी
  • ऐश्वर्या नारकर
  • अविनाश नारकर

(हेही वाचा G-20 : तुर्कीची काश्मीरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय Y20 बैठकीत हजेरी; पाकिस्तानचा जळफळाट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.