Airstrikes Iraq Forces: इराण समर्थित इराकी सैन्यावर हवाई हल्ला, अमेरिकेच्या लष्कराने फेटाळून लावले आरोप

116
Airstrikes Iraq Forces: इराण समर्थित इराकी सैन्यावर हवाई हल्ला, अमेरिकेच्या लष्कराने फेटाळून लावले आरोप

इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इराकमधील लष्करी तळावर स्फोट झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत, मात्र हा हल्ला कोणी केला, याची माहिती मिळालेली नाही. (Airstrikes Iraqi Forces)

इराण समर्थित पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स (PFM)च्या मुख्यालयावर हवाई हल्ला झाल्याचे वृत्त इस्रायल टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. पीएफएमच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा आरोप अमेरिकन सैनिकांवर केला आहे, मात्र अमेरिकन लष्कराने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मिडीयावर एका पोस्टद्वारे ही माहिती आहे. इस्रायलनेही या हल्ल्यासंदर्भातील आपली भूमिका नाकारली आहे.  (Airstrikes Iraq Forces)

(हेही वाचा – Bus Accident: ओव्हरटेक करताना बसचा भीषण अपघात, २१ पोलीस जखमी)

इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या UNSC अधिवेशनासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. इराण सध्या इस्रायलवर कोणत्याही हल्ल्याची योजना आखत नसल्याचे त्यांनी सांगितले. इराणविरुद्ध कोणतीही कारवाई केल्यास इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशारा हुसैन यांनी इस्रायलला दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमएफने इराक आणि सीरियामध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ले केले होते. हमासविरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने म्हटले होते. याच्या निषेधार्थ त्यांनी हा हल्ला केला, अशी माहिती पीएफएमने दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.