शिवशाही बस- मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तीन जखमी

98

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर (जि. रायगड) येथे मंगळवारी सकाळी एसटीची शिवशाही बस आणि खासगी मोटार यांच्या धडकेत दोन ठार आणि तीन लोक जखमी झाले आहेत. जयवंत सावंत (वय ६०, अंबरनाथ) आणि किरण घागे (वय २८, घाटकोपर) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत.

मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता हा अपघात घडला. खेडहून ठाण्याकडे निघालेल्या शिवशाही एसटी बसला (क्र. एमएच ०९ ईएम ३५३०) पोलादपूर स्टेट बँकेसमोर मारुती सुझुकी अर्टिगा (क्र. एमएच ०५ सीव्ही ३२९९) मोटारीने समोरून विरुद्ध दिशेने येऊन जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोटारीतील दोघे प्रवासी ठार झाले असून, गिरीश सावंत (34, अंबरनाथ), अमित भितळे (30, बदलापूर) आणि जयश्री सावंत (56, अंबरनाथ) हे मोटारीतील तिघे प्रवासी जखमी झाले. त्यांना पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश अर्जुन तरडे (ठाणे आगार) हे एसटी बस चालवत होते. महेश सदाशिव गायकवाड वाहक म्हणून काम करत होते. अपघातात एसटीतील कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत किंवा मरण पावले नाहीत. अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

( हेही वाचा: Metro-3: “हा ऐतिहासिक क्षण, आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही”,उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला )

एसटीच्या रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के आणि महाड आगाराचे व्यवस्थापक शिवाजी विष्णु जाधव यांनी तातडीने अपघातस्थळाला भेट दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.