तोतरा बोलणारा मुलगा झाला अमेरिकेचा मोठा अभिनेता Bruce Willis

122

वॉल्टर ब्रुस विलिस (Bruce Willis) हे एक अमेरिकन अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १९ मार्च १९५५ रोजी पश्चिम जर्मनीतील इडार-ओबेर्स्टीन येथे झाला. त्यांचे वडील डेव्हिड विलिस हे अमेरिकन सैनिक होते आणि आईचे नाव मार्लेन असून त्या जर्मन होत्या. लहानपणी विलिस तोतरे बोलायचे. म्हणून त्यांना मित्र ’बक बक’ म्हणून चिडवायचे. पुढे त्यांनी ड्रामा क्लबमध्ये प्रवेश घेतला आणि नाटकाचा असा प्रभाव पडला की त्यांचा तोतरेपणा कमी झाला.

पुढे तर त्यांची इतकी प्रगती झाली की त्यांची (Bruce Willis) स्टुडेंट काऊंसिलच्या अध्यक्षपदी निवड झाली. पेन्स ग्रोव्ह हायस्कूलमधून त्यांनी १९७३ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर विलिस यांनी सेलम न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. प्रायव्हेट इन्वेस्टिगेटर म्हणून काम करत असताना ते पुन्हा अभिनयाकडे वळले. विशेष म्हणजे त्यांच्या खर्‍या आयुष्यातली ही भूमिका त्यांना मूनलायटिंग आणि द लास्ट बॉय स्काऊट या सीरिजमध्ये साकारायची संधी मिळाली.

विलिसने (Bruce Willis) मॉन्टक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटीच्या नाटक कार्यक्रमात नावनोंदणी केली, जिथे त्याला कॅट ऑन अ हॉट टिन रूफच्या निर्मितीमध्ये भूमिका देण्यात आली. त्यांनी मॉन्टक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटीच्या नाट्य कार्यक्रमात नावनोंदणी केली, जिथे त्यांना कॅट ऑन अ हॉट टिन रूफमध्ये भूमिका देण्यात आली. १९८५ मध्ये आलेल्या मूनलायटिंगमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर त्यांनी १००+ चित्रपटांत अभिनय केला. १९८८ मध्ये आलेल्या डाय हार्ड फ्रेंचायजी या चित्रपटामुळे त्यांना ऍक्शन हीरो म्हणून प्रसिद्धी मिळाली.

विलिस (Bruce Willis) यांनी द लास्ट बॉय स्काउट, पल्प फिक्शन, १२ मंकीज, द फिफ्थ एलिमेंट, आर्मगेडन, द सिक्स्थ सेन्स, अनब्रेकेबल, द होल नाइन यार्ड्स असा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. २०२२ मध्ये ॲफेसियाचे निदान झाल्यामुळे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. २०२३ मध्ये त्यांना फ्रंटोटेम्पोरल डिमेंशियाचे निदान झाले. आता ते निवृत्त असून उपचार घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.